एक्स्प्लोर

WTC Points Table: श्रीलंकेने शड्डू ठोकला, न्यूझीलंडचा पराभव करत WTCच्या फायनलमध्ये दावा; टीम इंडियाची वाढली चिंता

Sri Lanka vs New Zealand WTC Points Table: श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली.

Sri Lanka vs New Zealand: श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत इतिहास रचला आहे. श्रीलंकेने तब्बल 15 वर्षांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. श्रीलंकेने न्यूझीलंडचा एक डाव आणि 154 धावांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत केलं. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने 63 धावांनी विजय मिळवला होता.

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात (Sri Lanka vs New Zealand) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला होता. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही विजय मिळवत श्रीलंकेने 2-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली आहे. या मालिका विजयासह जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धाच्या (WTC) गुणतालिकेत देखील मोठे उलटफेर झाले आहेत. श्रीलंकेने WTC च्या गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. 

WTC च्या गुणतालिकेची सध्यस्थिती-

WTC च्या गुणतालिकेत सध्या टीम इंडिया 71.67% गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 62.50% गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा पराभव करत श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. श्रीलंकेचे 55.56% गुण झाले आहेत. तर इंग्लंडचा संघ 42.19% गुणांसह चौथ्या, 39.29% गुणांसह बांग्लादेश पाचव्या, 38.89 % गुणांसह दक्षिण अफ्रिका सहाव्या, 37.50 % गुणांसह न्यूझीलंड सातव्या स्थानावर आहे. तर 19.5 % गुणांसह पाकिस्तानचा संघ आठव्या क्रमांकावर आणि 18.52 वेस्ट इंडिजचा संघ नवव्या स्थानावर आहे.

श्रीलंकेने सनथ जयसूर्यावर सोपवली मोठी जबाबदारी-

श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माजी दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्या यांनी धुरा घेतल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने इतिहास रचण्यास सुरुवात केली आहे. श्रीलंकेने पहिले भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना जिंकला आणि आता कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 2-0 अशा फरकाने विजय मिळवला. 

भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात पावसाची बँटिंग

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात फक्त एक दिवसाचा खेळ झाला आहे. पावसामुळे कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. तर आज तिसरा दिवसाचा खेळही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 27 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सामन्यात पहिल्या दिवशीही पावसाने हजेरी लावली होती. कसोटीमधील दुसरा आणि तिसरा दिवस एकही चेंडू न टाकता रद्द झाला आहे.

संबंधित बातमी:

IPL 2025 Auction Rules: 18,14,11,18,14..., छप्परफाड पैसा; IPL मधील फ्रँचायझीने संघात कायम ठेवल्यास खेळाडू होणार मालामाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : राज्यातील 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP MajhaSolapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडीAkshay Shinde Encounter : एन्काऊंटर संदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिपAkshay Shinde : अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारावरुन उल्हासनगरमध्ये मोठा तणाव, स्थानिकांचा विरोध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
Mallikarjun Kharge Video : स्टेजवर भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती खालावली; म्हणाले, मी इतक्या लवकर मरणार नाही!
Video : स्टेजवर भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती खालावली; म्हणाले, मी इतक्या लवकर मरणार नाही!
Embed widget