WTC Points Table : WTC पॉइंट्स टेबल अपडेट! वेस्ट इंडीज-न्यूझीलंड संघाने खाते उघडलं, टीम इंडियासह कोण कोणत्या स्थानी? जाणून घ्या सर्वकाही
World Test Championship Points Table Marathi News : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या नवीन चक्रात आता सर्व संघांनी किमान एक तरी सामना खेळून पूर्ण केला आहे.

WTC Points Table : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या नवीन चक्रात आता सर्व संघांनी किमान एक तरी सामना खेळून पूर्ण केला आहे. नुकताच संपलेला सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात झाला आणि तो ड्रॉ राहिल्यामुळे दोन्ही संघांनी आपले खाते उघडले आहे. जरी कोणताही संघ सामना जिंकला नसला तरी, सामना अनिर्णित राहिला. ज्यामुळे दोन्ही संघांना कमी गुण मिळाले आणि विजयाची टक्केवारी कमी झाली, ज्याचा भविष्यात त्यांना फायदा होऊ शकतो.
WTC मध्ये वेस्ट इंडीज-न्यूझीलंड संघाने खाते उघडलं
न्यूझीलंड संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे, जो अनिर्णित राहिला, तरीही संघ सातव्या स्थानावर आहे, तर वेस्ट इंडिज संघाने 6 पैकी 5 सामने गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. कॅरिबियन संघ नवव्या स्थानावर आहे. बांगलादेश आठव्या स्थानावर आहे, ज्याने 2 पैकी एक सामना जिंकला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.
A mammoth batting effort from the West Indies middle-order helps the visitors draw the first #NZvWI Test in Christchurch 👏#WTC27 📝: https://t.co/1W0563ctBn pic.twitter.com/SpyWYoS8ia
— ICC (@ICC) December 6, 2025
इंग्लंड संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंडने 6 सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर त्यांना 3 सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडच्या विजयाची टक्केवारी 36.11 आहे. शेवटच्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिज संघाची विजयाची टक्केवारी 5.56 टक्के आहे. तर बांगलादेश संघाची विजयाची टक्केवारी 16.67 टक्के आहे.
टीम इंडियासह कोण कोणत्या स्थानी?
दरम्यान, 2025-27 च्या WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया हा अव्वल संघ आहे, ज्याने आतापर्यंत सर्व चार सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाची विजयाची टक्केवारी 100 आहे. इतर कोणत्याही संघाचा ऑस्ट्रेलियाइतका विजयाची टक्केवारी नाही. पण, दक्षिण आफ्रिकेने त्यांचे 75 टक्के सामने जिंकले आहेत, चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहेत. श्रीलंका 66.67 टक्के सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान दोनपैकी एक सामने जिंकून चौथ्या स्थानावर आहे. भारताने नऊपैकी चार सामने जिंकले आहेत आणि ते पाचव्या स्थानावर आहे. भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 48.15 आहे.
हे ही वाचा -





















