WTC Points Table 2025-26: ऑस्ट्रेलिया नंबर 1, इंग्लंड सातव्या क्रमांकावर; WTC च्या Points Table मध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडिया कुठे?
WTC Points Table 2025-26: इंग्लंडविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीतील निर्णायक विजयानंतर, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे.

WTC Points Table 2025-26: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Aus vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेन येथे डे-नाईट टेस्ट (Ashes 2025-26) म्हणून खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला आठ विकेट्सने पराभूत करून मालिकेत 2-0 अशी मजबूत आघाडी घेतली. ब्रिस्बेन कसोटीतील निर्णायक विजयानंतर, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रँकिंगमध्ये (WTC Points Table 2025-26) इंग्लंडच्या अडचणी आता वाढल्या आहेत.
इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने 2025-27 च्या WTC क्रमवारीत 100% टक्केवारी गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आहे, ऑस्ट्रेलियाने पाचही कसोटी सामने जिंकले आहेत. दरम्यान, ब्रिस्बेन कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडला मोठा पराभव सहन करावा लागला, आता WTC क्रमवारीत इंग्लंडचा संघ सहाव्या वरून सातव्या स्थानावर घसरला. सध्याच्या कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत टीम इंडिया पाचव्या स्थानावर आहे. (Latest WTC Points Table 2025-26)
बांगलादेश आठव्या, वेस्ट इंडिज नवव्या क्रमांकावर- (WTC Points Table 2025-26)
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत इंग्लंडने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त दोनच जिंकले आहेत. इंग्लंडच्या संघाने चार पराभव पत्करले आहेत आणि एक अनिर्णित राहिला आहे. इंग्लंडची सध्याची विजयाची टक्केवारी 30.95 आहे. WTC 2025-27 गुणतालिकेत बांगलादेश आठव्या क्रमांकावर (16.67) आणि वेस्ट इंडिज नवव्या (5.55) क्रमांकावर आहेत.
🚨 AUSTRALIA - TOP OF THE WTC 2027 TABLE 🚨 pic.twitter.com/JLsCD0Jqse
— Johns. (@CricCrazyJohns) December 7, 2025
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील दुसरा कसोटी सामना कसा राहिला? (Aus vs ENG Ashes 2025-26)
ब्रिस्बेन कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती, इंग्लंडने फक्त पाच धावांत दोन विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर, इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटच्या शानदार शतक (138 धावा) आणि जॅक क्रॉली (76 धावा) यांच्या अर्धशतकामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 334 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 511 धावा केल्या आणि 177 धावांची मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 241 धावांवर सर्वबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने फक्त 65 धावांचे लक्ष्य मिळाले. विजयासाठी मिळालेले 65 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने अवघ्या 10 षटकांत पूर्ण करत सामना जिंकला.




















