चल नीघ तिकडं...हरमनप्रीत कौर सोफी एक्लेस्टोनच्या अंगावर धावून गेली, अम्पायर समोर काय काय घडलं? Video
UP W vs MI W WPL 2025 : चल नीघ तिकडं...हरमनप्रीत कौर सोफी एक्लेस्टोनच्या अंगावर धावून गेली, अम्पायर समोर काय काय घडलं? Video

UP W vs MI W WPL 2025 : वुमेन प्रिमिअर लीगच्या 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यूपी वॉरियर्सचा (UP Warriorz) धुव्वा उडवलाय. यूपीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 150 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्ससमोर 151 धावांचं लक्ष ठेवलं होतं. यूपीचं हे आव्हान मुंबई इंडियन्सने 18.3 षटकांमध्ये सहरित्या गाठलं. मात्र, या सामन्यादरम्यान, प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि युपीची खेळाडू सोफी एक्सेस्टोन मैदानात भिडलेले पाहायला मिळालेत. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Here is the video 🤣🤣 https://t.co/lMjmqNlbzB pic.twitter.com/wXx95joOY1
— 🐐 (@itshitmanera) March 6, 2025
हरमनप्रीत कौर सोफी एक्लेस्टोनच्या अंगावर धावून गेली
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यूपीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात मैदानात उतरला होता. यूपीकडून सोफी नंबर 9 वर फलंदाजीसाठी उतरली होती. दरम्यान, 19 वे षटक सुरु झाल्यानंतर हा वाद झाल्यावर पाहायला मिळाला. स्लो ओव्हर रेटमुळे क्षेत्ररक्षणावर मर्यादा आल्याने वाद वाढल्याचे पाहायला मिळाले. अम्पायरने हरमनप्रीतला सांगितले की, शेवटच्या षटकात 30 यार्डच्या सर्कल बाहेर तीन क्षेत्ररक्षक ठेऊ शकता येतील.
Here is the video 🤣🤣 https://t.co/lMjmqNlbzB pic.twitter.com/wXx95joOY1
— 🐐 (@itshitmanera) March 6, 2025
30 यार्ड सर्कलच्या बाहेर जास्तीचा फिल्डर ठेवता येणार नसल्याने मोठा वाद
अंम्पायरने सांगितलेला नियमानंतर हरमनप्रीत नाराज झालेली पाहायला मिळाली. यावेळी मुंबईसाठी अमेलिया केर हिला शेवटचे षटक टाकावे लागले. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जास्तीचा फिल्डर नसल्याने ती देखील चिंतेत पाहायला मिळाली. दरम्यान, यूपीची खेळाडू सोफी नॉन स्ट्राइक एंडवर होती आणि तिने अंपायरला काहीतरी सांगितले. यावर हरमनप्रीतचा राग वाढला आणि त्यांच्यात वाद झाला. मात्र, पंचांनी प्रकरण शांत केले. या घटनेचा व्हिडिओही X वर शेअर करण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्सचा यूपीवर 6 विकेट्सने विजय
यूपीने प्रथम फलंदाजी करताना 150 धावा केल्या होत्या. यूपीकडून जॉर्जिया वॉलने अर्धशतक झळकावले, तिने 55 धावांची खेळी खेळली तर ग्रेस हॅरिसने 28 धावा केल्या. कर्णधार दीप्ती शर्माने 27 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबईने 18.3 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. मुंबईकडून हिली मॅथ्यूजने 68 धावांची खेळी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या




















