(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UPW-W vs GG-W : रोमहर्षक सामन्यात युपी संघाचा गुजरातवर विजय, 3 विकेट्सनी दिली मात
WPL 2023, UPW-W vs GG-W : प्रथम फलंदाजी करत गुजरात संघानं 179 धावाचं आव्हान युपीसमोर ठेवलं होतं, जे त्यांनी अखेरच्या ओव्हरपर्यंत खेळत पूर्ण करुन विजय मिळवला. या विजयासह युपी प्लेऑफमध्ये पोहोचली असून गुजरातचा संघ स्पर्धेबाहेर झाला आहे.
UPW-W vs GG-W, Match Highlights : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेतील आजच्या गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स (Gujrat giants vs UP Warriors) या दोन संघात पार पडलेल्या सामन्यात युपी संघाने दमदर खेळ करत 3 विकेट्स राखून गुजरात संघाला मात दिली आहे. टॉस जिंकून गुजरात संघानं प्रथम फलंदाजी 178 हा एक चांगल स्कोर उभारला होता. पण ग्रेस हॅरिस आणि ताहिला मॅग्राथ या दोघींच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर 19.5 षटकांत हे आव्हान पूर्ण करत युपी संघाने विजय मिळवला. या विजयासह युपी प्लेऑफमध्ये पोहोचली असून गुजरातचा संघ स्पर्धेबाहेर झाला आहे.
संपूर्ण सामन्याचा विचार केल्यास सर्वात आधी नाणेफेक जिंकत गुजरात जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा त्यांचा डाव होता. बऱ्यापैकी त्यांनी ही कामगिरी पारही पाडली. सलामीला आलेल्या सोफिया डन्कले आणि लॉरा वूल्वर्डट यांनी चांगली सुरुवात केली. पण 41 धावांवर लॉरा 17 धावा करुन बाद झाली. त्यानंतर सोफिया, हरलीन या देखील अनुक्रमे 23 आणि 4 धावा करुन बाद झाल्या. त्यानंतर मात्र दयालन हेमलता आणि अॅश्ले गार्डनर यांनी एक दमदार भागिदारी उभारली. दयालनने 33 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार ठोकत 57 धावा केल्या. तर अॅश्नेने 39 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार ठोकत 60 धावा केल्या. यूपीकडून पार्श्ववी चोप्रा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर अंजली सर्वानी आणि एक्ल्स्टोन यांनीही एक-एक विकेट घेतली. सर्वात आधी सलामीवीर देविका वैद्य आणि अॅलिसा हेली यामनी अनुक्रमे 7 आणि 12 धावा केल्या. तर किरण नवघिरेही 4 धावा करुन बाद झाली त्यानंतर मात्र ताहिला मॅग्राथ आणि ग्रेस हॅरिस यांनी दमदार अर्धशतकं ठोकली. तहिलानं 57 तर ग्रेसनं 72 धावांची दमदार झुंज दिली. त्यानंतर विजयी धावा घेणाऱ्या सोफि एक्स्लस्टेनं देखील नाबाद 19 धावा केल्या. गुजरातकडून किम ग्रॅथनं 1 तर मोनिका पटेल, अॅश्ले गार्डनर, तनुजा आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
गुजरात संघाची अखेपर्यंत लढत
युपी संघाने तीन विकेट्स आणि एक चेंडू राखून सामना जिंकला असल तरी गुजरात संघानं तगडी टक्कर दिली. त्यामुळे एक अत्यंत रोमहर्षक सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाला. 179 धावाचं एक मोठं लक्ष युपी संघानं पार केलं खरं पण त्यांनाा बऱ्याच अडचणींचा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत करावा लागला.
हे देखील वाचा-