WPL 2023 : मुंबई पाठोपाठ युपी, बंगळुरुसह दिल्ली संघाची जर्सीही आली समोर, पाहा खास VIDEO
Womens IPL 2023 : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाची सुरुवात 4 मार्चपासून होत असून सर्व संघाच्या जर्सीस आता समोर येत आहेत.
WPL 2023 Teams Jersey : पुरुषानंत आता महिला प्रीमियर लीग (WPL) देखील भारतात खेळवली जाणार आहे. यंदा या स्पर्धेचा पहिला हंगाम पार पडणार आहे. 4 मार्चपासून सामन्यांना सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्याने स्पर्धेची होणार आहे. या भव्य स्पर्धेत जगभरातील अव्वल दर्जाच्या महिला क्रिकेटर सहभागी होत असून संघ व्यवस्थापनांनी देखील जोरदार तयारी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाची जर्सी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ज्यानंतर आता दिल्ली, युपीसह बंगळुरु संघाची जर्सी कशी असणार आहे, ते देखील समोर आलं आहे. फ्रॅचायझीसनी आपआपल्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट करत या जर्सीसचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. या व्हिडीओंवर एक नजर फिरवू...
दिल्ली संघाची जर्सी
Threads that will unite our 🦸♀️ ❤️💙
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 2, 2023
Here's our DC Jersey for the #WPL2023 season 🫶#YehHaiNayiDilli #CapitalsUniverse pic.twitter.com/4MMJ1gOvgR
आरसीबीची जर्सी घालून कॅप्टन स्मृती मंधाना
Golden Hour ft. Skipper Smriti 🌅 pic.twitter.com/gKCofxms3P
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 2, 2023
युपीची जर्सीही आहे अगदी खास
Our threads, inspired by the warrior Rani Lakshmibai! ⚔️🔥#UPWarriorzUttarDega #WPL pic.twitter.com/Fk3LbGPsNs
— UP Warriorz (@UPWarriorz) February 28, 2023
पुरुष संघाप्रमाणे आहे मुंबई जर्सी
🌅- here’s to sun, the sea, the blue-and-gold of Mumbai. Here’s to our first-ever #WPL jersey and all she brings. 🫶#OneFamily #MumbaiIndians #AaliRe pic.twitter.com/mOmNg0d9hO
— Mumbai Indians (@mipaltan) February 25, 2023
कोणते संघ सहभाग घेत आहेत?
मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स.
कुठे होणार सामने?
सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.
कुठे पाहाल लाईव्ह सामना?
Viacom-18 ने महिला प्रीमियर लीगच्या सर्व सामन्यांचे डिजिटल आणि टीव्ही प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. ज्यामुळे सर्व 22 सामन्यांचे थेट प्रक्षेपण व्हायकॉम-18 च्या स्पोर्ट्स चॅनेल 'स्पोर्ट्स-18 1', 'स्पोर्ट्स-18 1एचडी' आणि 'स्पोर्ट्स-18 खेल' या वाहिन्यांवर केले जाईल. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल.
कसं आहे संपूर्ण वेळापत्रक?
4 मार्च : गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
5 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, (3:30 PM, ब्रेबॉर्न)
5 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
6 मार्च: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
7 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
8 मार्च: गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
9 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
10 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध यूपी वॉरियर्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
11 मार्च: गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
12 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (सायं. 7:30, ब्रेबॉर्न स्टेडियम)
13 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
14 मार्च: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
15 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
16 मार्च: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
18 मार्च: मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (3:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
18 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात जायंट्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
20 मार्च: गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (3.30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
20 मार्च: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
21 मार्च: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स (3:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
21 मार्च: यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
24 मार्च: एलिमिनेटर (7:30 PM, डी.वाय पाटील स्टेडियम)
26 मार्च: अंतिम (7:30 PM, ब्रेबॉर्न स्टेडियम)
हे देखील वाचा-