एक्स्प्लोर

India vs Australia 3rd Test: टीम इंडिया Vs ऑस्ट्रेलिया इंदूर टेस्ट आज... तिसरी कसोटीही जिंकली, तर टीम इंडिया खेळणार थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल

India vs Australia 3rd Test: आजपासून इंदूर कसोटी सुरू होतेय. जर टीम इंडियानं तिसरी कसोटीही जिंकली, तर टीम इंडिया थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठणार आहे.

India vs Australia 3rd Test: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना (India vs Australia 3rd Test Updates) आजपासून (1 मार्च) इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. सकाळी 9.30 पासून सामना सुरु होईल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) दृष्टीने हा सामना भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket Team) खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाने यापूर्वीचे दोन सामने जिंकून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आजपासून सुरु होणारी कसोटीही टीम इंडियाने आपल्या नावे केली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं तिकीटही टीम इंडिया आपल्या नावे करणार आहे. 

भारतीय क्रिकेट संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करायचं असेल तर त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकावाच लागेल. म्हणजेच, इंदूर कसोटी जिंकली तर त्यासोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया थेट प्रवेश करेल. 

भारतीय संघाला एक सामना जिंकणं आवश्यक 

ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील कसोटी मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर आता टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत आतापर्यंत 16 पैकी 10 सामने जिंकले आहेत. त्यामध्ये 4 सामन्यांत पराभव आणि 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच, टीम इंडिया 64.06 पॉईंट टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

आता भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवायचं असेल, तर उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला जिंकावाच लागेल. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत 17 पैकी 10 कसोटी जिंकल्या आहेत, 3 सामन्यांत पराभव झाला आहे आणि 4 सामने अनिर्णित राहिले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 66.67 गुणांच्या टक्केवारीसह यापूर्वीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 

7 जूनपासून लंडनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल  

आता जर भारतीय क्रिकेट संघाने शेवटच्या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्समध्ये प्रवेश केला, तर टीम इंडियाची अंतिम लढत पुन्हा ऑस्ट्रेलियाशी होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून खेळवला जाणार आहे.

2021-2023 हंगामात, ICC ने पॉईंट सिस्टममध्ये काही बदल केले आहेत. यावेळी कसोटी सामना जिंकण्यासाठी प्रत्येक संघाला 12 गुण दिले जात आहेत. बरोबरीसाठी 6 गुण, ड्रॉसाठी 4 गुण आणि पराभवासाठी कोणतेही गुण देण्यात आलेले नाहीत. दुसरीकडे, गुणांच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झाल्यास, जिंकल्यावर 100, टाय झाल्यास 50, ड्रॉ झाल्यास 33.33 आणि हरल्यावर एकही गुण दिला जाणार नाही. 

आजच्या कसोटीसाठी दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग-11 

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल/शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज. 

टीम ऑस्ट्रेलिया : ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरुन ग्रीन, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नाथन लियोन आणि मॅथ्यू कोह्नमॅन/स्कॉट बोलँड/लॉन्स मोरिस. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

India vs Australia 3rd Test Indore : इंदूर कसोटीत टीम इंडियाची 'सत्वपरीक्षा'; कांगारुची साथ देऊ शकते लाल मातीची धावपट्टी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget