सात वर्षांनंतर पाकिस्तानचा संघ भारतात दाखल, विश्वचषकाचे काऊंटडाऊन सुरु
pakistan World cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी (Wprld Cup 2023) पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला आहे.
pakistan World cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी (Wprld Cup 2023) पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला आहे. बुधवारी रात्री आठ वाजता पाकिस्तानचा संघ हैदराबादमध्ये पोहचला. सहा वर्षांनंतर पाकिस्तानचा संघ भारतात आला आहे. विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा संघ दोन सराव सामने खेळणार आहे. पाकिस्तान संघ 29 सप्टेंबरला हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर ६ ऑक्टोबरला वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात करणार आहे.
2016 टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ शेवटचा भारतात आला होता. दोन देशांमधील राजकीय तणावामुळे क्रिकेट संघ फक्त आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. आता पाच ऑक्टोबरपासून होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान याच्यात लढत होणार आहे.
🚨 BREAKING NEWS 🚨
— Hamxa 🏏🇵🇰 (@hamxashahbax21) September 27, 2023
ALHUMDULILLAH Pakistan team's plane has landed in Hyderabad, India. ♥️#ICCWorldCup #CWC23 pic.twitter.com/uxFAlZEOg7
Breaking News: Pakistan team's plane has landed in Hyderabad, India. Alhamdullilah ❤️
— Ali Hassan (@meharali786ta) September 27, 2023
Pakistan's team is in India after 7 years. #CWC23 #WorldCup2023 pic.twitter.com/dtq1IQ1JhV
Fans are Waiting for Pakistan Team 🏏🫶🏻🔥🔥👊🚀#ICCRankings #CWC23 #INDvsAUS#WorldCup2023 #INDvAUS #CWC23 #BabarAzam𓃵 #ICCWorldCup2023 #Amir #PakistanCricket #uefachampionsleague #เบียร์เดอะวอยซ์ #PakistanCricketTeam #fearwomen #Abhiya #Hyderabad #NaseemShah pic.twitter.com/E6tQC1ytPL
— Haider Safdar (@BhaiiiHaider) September 27, 2023
पाकिस्तान संघाचे विश्वचषकाचे वेळापत्रक -
सहा ऑक्टोबर - नेदरलँड्स - हैदराबाद
10 ऑक्टोबर श्रीलंका - हैदराबाद
१४ ऑक्टोबर - भारत- अहमदाबाद
20 ऑक्टोबर -ऑस्ट्रेलिया - बेंगळुरु
23 ऑक्टोबर -आफगाणिस्तान -चेन्नई
27 ऑक्टोबर -दक्षिण आफ्रिका -चेन्नई
31 ऑक्टोबर - बांगलादेश - कोलकाता
4 नोव्हेंबर - न्यूझीलंड - बेंगळुरु
12 नोव्हेंबर -इंग्लंड कोलकाता
नसीम शाह आऊट, हसन अली याला संधी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी १५ शिलेदारांची घोषणा केली. २२ सप्टेंबर रोजी पीसीबीने ट्वीट करत खेळाडूंची नावे जाहीर केली. दुखापतीमुळे नसीम शाह याला विश्वचषकात खेळता येणार नाही. त्याच्याजाही असन अली याला संधी देण्यात आली आहे. नसीम शाह याला आशिया चषकात दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेलाय. शादाब खान, मोहम्मद नवाज आणि उसामा मीर या तीन फिरकी गोलंदाजांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आजम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, सलमान आगा, शादाब खान (उप-कर्णधार), मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, सऊद शकील, हॅरिस रौफ.
Breaking News: Pakistan team's plane has landed in Hyderabad, India. Alhamdullilah ❤️Pakistan's team is in India after 7 years. #Hyderabad #pakicricketteam #Pakistan #welcometoindia pic.twitter.com/jnnaK9pIoC
— 𝙵ᴀ𝚁Ꮋᴀᚺ (@Farhanghori008) September 27, 2023
Breaking News: Pakistan team's plane has landed in Hyderabad, India. Alhamdullilah ❤️
— Muhammad Sami (@MuhammadSa79220) September 27, 2023
Pakistan's team is in India after 7 years#Hyderabad