एक्स्प्लोर

IND vs ENG : रोहित शर्माच्या निशाण्यावर तीन मोठे विक्रम, साहेबांविरोधात करणार धमाल

Rohit Sharma, IND vs ENG :  गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला उद्या होणाराय.

Rohit Sharma, IND vs ENG :  गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला उद्या होणाराय. योगायोगाची बाब म्हणजे विश्वचषकातल्या या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडची गाठ रोहित शर्माच्या भारतीय संघाशी पडणार आहे. या दोन संघांमधला विरोधाभास म्हणजे विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड शेवटून दुसऱ्या म्हणजे नवव्या स्थानावर आहे. भारतानं आतापर्यंत पाचपैकी पाचही सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला पाचपैकी बांगलादेशविरुद्धचा केवळ एकमेव सामना जिंकता आला आहे. त्यामुळं भारताला हरवून विश्वचषकातलं आपलं आव्हान टिकवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहिल. तर रोहित शर्माचा भारतीय संघ इंग्लंडला हरवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा नेटानं प्रयत्न करेल.  इंग्लंडविरोधात रोहित शर्मा तीन मोठे विक्रम करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा पल्ला, विश्वचषकात सर्वाधिक षटकार आणि 100 सामन्यात कर्णधार... हे तीन विक्रम रोहितच्या निशाण्यावर आहेत.

1-  कर्णधार म्हणून रोहित शर्माचा 100 वा सामना -

रोहित शर्माने 2017 मध्ये पहिल्यांदा टीम इंडियाचे नेतृत्व संभाळले होते.  तो तेव्हा नियमित कर्णधार नव्हता. मात्र विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा नियमित कर्णधार बनला. कर्णधार म्हणून त्याने भारतासाठी 99 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रविवारी रोहित शर्मा मैदानात उतरताच 100 सामन्यात कर्णधार होण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. 

2- 47 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18,000 धावांचा पल्ला

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 17953 धावा केल्या आहेत. आता त्याला 18,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 47 धावांची गरज आहे. इंग्लंडविरोधात हा पल्ला तो सहज पार करु शकतो. त्यासाठी रोहित शर्माला 47 धावांची गरज आहे.   18,000 आंतरराष्ट्रीय धावा पार करणारा रोहित शर्मा पाचवा भारतीय खेळाडू ठरणार आहे. रोहितपूर्वी भारतीय फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी हा आकडा पार केला आहे.

3- विश्वचषकात सर्वाधिक षटकार - 

रोहित शर्माने आतापर्यंत पाच सामन्यात 17 षटकार मारले आहेत. विश्वचषकात त्याच्या नावावर 40 षटकारांची नोंद आहे. 2015 ते 2023 यादरम्यान त्याने 40 षटकार मारले आहेत. विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमापासून रोहित शर्मा फक्त 10 षटकार दूर आहे.   विश्वचषकात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या यादीत ख्रिस गेल 49 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडविरोधात रोहित शर्मा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा लढण्यासाठी पत्नीला  विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur : कर्नाटकातील संत दानेश्वर महाराजांकडून अन्नदान, भाविकांसाठी नाश्ता, भोजनाची सेवाChhatrapati Sambhajinagar Crime  : समृद्धी महामार्गावर हातात पिस्तुल घेऊन रिल बनवणं भोवलंTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 5 PM : 16 जुलै 2024: ABP MajhaPooja Khedkar Case : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या प्रशिक्षणाला ब्रेक;मसुरीला पुन्हा बोलावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला  विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला
''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला
Embed widget