पाकचा सामना बंगळुरुत, मात्र पाकिस्तानी मीडियाकडून फेक न्यूजचा भडिमार, गॅस स्फोटाला म्हणाले बॉम्बस्फोट
Pakistan Cricket Team In Bengaluru: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर सोशल मीडियातील वातावरण आणखी तापले आहे.
Pakistan Cricket Team In Bengaluru: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर सोशल मीडियातील वातावरण आणखी तापले आहे. पाकिस्तानमधील काही नेटकऱ्यांनी भारतावर आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. त्यातच आता पाकिस्तान सराव करत असलेल्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचे पाकिस्तानच्या काही नेटकऱ्यांनी आणि पत्रकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. पाकिस्तान आमि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 20 ऑक्टोबर रोजी बेंगळुरु येथे विश्वचषकाचा सामना होणार आहे. त्याआधीच पाकिस्तानचा संघ सराव करतोय, तिथे बॉम्बस्फोट झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. पाकिस्तानमधील काही पत्रकारांनी याबाबत ट्वीट करत अफवांमध्ये आणखी भर घातली. बेंगळुरुमध्ये कोणत्या बॉम्बस्फोटची घटना घडली नाही. पीआयबीने पाकिस्तानच्या पत्रकारांनी केलेला दावा खोडून काढला आहे. बेंगळुरुमध्ये कोणताही बॉम्बस्फोट झालेला नाही. बेंगळुरुमध्ये आगीची घटना घडली होती. त्याचे फोटो पाकिस्तानी मीडियाने वापरल्याचे पीआयबीने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या पत्रकारांनी काय केला दावा ?
पाकिस्तानी पत्रकार वजहत काजमी याने ट्वीटवर म्हटले की, “बेंगळुरुमध्ये बॉम्बस्फोट झाला. पाकिस्तान संघाने आपल्या सुरक्षेबाबत बोलायला हवे. शुक्रवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. ”
पत्रकार फरीद खान याने म्हटले की, "बेंगळुरुच्या मडपाइप कॅफेमध्ये धमाका झाला आहे. सर्वजण सुरक्षित असतील, अशी आशा आहे. पाकिस्तान संघ आज बेंगळुरुमध्ये सराव करणार होते. पाकिस्तानला ऑस्ट्रेलिसोबत खेळायचं आहे.”
त्याशिवाय इतर अन्य पाकिस्तानी पत्रकारांनी बेंगळुरुमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी काही फोटोही पोस्ट केले आहेत. पण पीआयबीने हे अफवा असल्याचे म्हटलेय.
बेंगळुरुमध्ये काय झालं होतं ?
मीडिया रिपोर्टेसनुसार, बेंगळुरुमधील कोरमंगला परिसरात सिलेंडर ब्लास्ट झाला होता. त्यामध्ये काही लोक जखमी झाले होते. पण पाकिस्तानच्या पत्रकारांनी पाकिस्तान संघाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. ट्वीटमध्ये त्याबाबत वेगवेगळ्या अफवा उडवल्या.
ICC events in India:
— Johns (@JohnyBravo183) October 18, 2023
2023 WC (ongoing)
2025 Women's WC
2026 T20 WC
2029 CT
2031 WC
Pakistanis spreading misinformation about the cylinder blast ensured that:
1. They will cry & still won't get visa for any of these.
2. Their team will face the wrath of crowd in each one of… pic.twitter.com/tx2WtytA1I
पीआयबीने काय म्हटले ?
पाकिस्तान संघ सराव करतो, तिथे बॉम्बस्फोट झाल्याचा दावा पाकिस्तान मीडियाने केल्यानंतर पीआयबीने याबाबत फॅक्ट चेक केले. पीआयबीने हा दावा खोडून काढला. असा कोणताही बॉम्बस्फोट बेंगळुरुमध्ये झालेला नाही. कोरमंगला परिसरात सिलिंडर ब्लॉस्टमुळे आगीची घटना घडली होती. पाकिस्तानी मीडियाने केलेला दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे पीआयबीने म्हटलेय.
Several social media accounts are spreading misinformation related to a blast in Bengaluru ahead of the #PAKvAUS cricket match #WC2023#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 18, 2023
❌These claims are #FAKE
▶️The images are from a fire incident that happened in a cafe in the Koramangala area of Bengaluru. pic.twitter.com/SauavTP58f