एक्स्प्लोर

World Cup 2019 | मॅन्चेस्टरमध्ये कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम

विराट कोहलीनं मॅन्चेस्टरमध्ये 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांनीही 453 डावांत 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला होता.

मॅन्चेस्टर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं मॅन्चेस्टरमध्ये 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. त्यानं 417 डावांत हा टप्पा गाठून सर्वात जलद 20 हजार धावा करण्याचा मान मिळवला. विराटनं मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर विंडीजविरुद्ध विश्वचषकाच्या साखळी सामन्यात 37 वी धाव घेत लारा आणि सचिनचा विक्रम मागे टाकला. विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांनीही 453 डावांत 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा पूर्ण करणारा विराट हा भारताचा केवळ तिसराच फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरच्या खात्यात 34,357 धावा जमा आहेत. तर राहुल द्रविडनं 24,208 धावांचा रतीब घातलाय. विराटची अकरा वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सामने - 376 डाव - 417 धावा - 20,035 सरासरी - 56.43 शतकं - 66 अर्धशतकं - 93 विश्वचषकात विराटचं सलग चौथं अर्धशतक विराट कोहलीनं इंग्लंडमधल्या विश्वचषकात आपला सुपर फॉर्म कायम ठेवला आहे. त्यानं मॅन्चेस्टरमध्ये यंदाच्या विश्वचषकातलं सलग चौथं अर्धशतक साजरं केलं. एकाच विश्वचषकात सलग चार वेळा पन्नास पेक्षा अधिक धावा करणारा तो सचिन आणि नवज्योत सिंग सिद्धूनंतरचा तिसरा भारतीय खेळाडू ठरला. विराटनं यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 82, पाकिस्तानविरुद्ध 77, अफगाणिस्तानविरुद्ध 67 आणि विंडीजविरुद्ध 72 धावा अशा सलग अर्धशतकी खेळी साकारल्या. भारताचा माजी कसोटीवीर नवज्योत सिंग सिद्धूनं 1987 च्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा अशी कामगिरी बजावली होती. त्यानंतर सचिन तेंडुलकरनं 1996 आणि 2003 च्या विश्वचषकात सलग चार वेळा पन्नासहून अधिक धावा फटकावल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget