एक्स्प्लोर
Asia Cup Final : महिला आशिया चषक 2022 भारताचा, 8 विकेट्सनी श्रीलंकेला दिली मात, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
IND vs SL : महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंका महिला संघाला 8 विकेट्सने मात देत सातव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं आहे.
IND vs SL, Asia Cup Final : भारतीय पुरुषांना यंदाचा आशिया चषक जिंकता आला नसला तरी भारतीय महिला संघाने मात्र महिलांच्या आशिया कप स्पर्धेत (Womens Asia Cup) सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आजच्या भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lankla) या अंतिम सामन्यात (Asia Cup 2022 Final) भारतीय महिलांनी 8 विकेट्सच्या फरकानं श्रीलंका संघाला मात देत सातव्यांदा आशिया चषक खिशात घातला आहे. यावेळी आधी उत्तम गोलंदाजी करत भारतानं 65 धावांवर श्रीलंकेला रोखलं, यावेळी रेणुका सिंहने अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानंतर भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने नाबाद 51 धावा ठोकल्या. तिच्या अर्धशतकाच्या जोरावर 8 विकेट्स राखून भारताने विजय मिळवला, तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs SL Final 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. पण आज मात्र नाणेफेक जिंकूनही श्रीलंकेला विजय मिळवता आला नाही.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- पण भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा हा निर्णय चूकीचा ठरवत भेदक गोलंदाजी करत सुरुवातीपासून श्रीलंकेच्या फलंदाजांना सळो की पळो केलं.
- श्रीलंकेकडून केवळ ओशादी रणसिंघेने 13 आणि इनोका रणवीराने नाबाद 18 धावा केल्यामुले त्यांनी 65 धावांपर्यंत मजल मारली.
- भारताकडून रेणुका सिंहने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
- 66 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सलामीवीर शेफाली 5 धावा करुन स्वस्तात बाद झाली.
- जेमिमा देखील 2 धावा करुन बाद झाली पण स्मृतीने मात्र चौफेर फटकेबाजी सुरुच ठेवली होती.
- अखेर स्मृतीच्या नाबाद 51 आणि कर्णधार हरमनप्रीतच्या नाबाद 11 धावांच्या जोरावर भारताने सामना आणि कप दोन्ही जिंकले.
- यावेळी प्लेअर ऑफ द मॅच म्हणून भारताच्या रेणुका सिंहला गौरवण्यात आलं.
- तर या भव्य स्पर्धेची प्लेअर ऑफ द सिरीद भारताची स्टार गोलंदाज दीप्ती शर्मा ठरली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement