एकदिवसीय मालिका जिंकणं सोपं नाही; ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर भारताची कामगिरी कशी? पाहा आकडेवारी
Old Trafford ODI Records: भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना उद्या म्हणजेच 16 जुलै 2022 रोजी खेळला जाणार आहे.
Old Trafford ODI Records: भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना उद्या म्हणजेच 16 जुलै 2022 रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतानं तर, दुसरा सामना इंग्लंडनं जिंकलाय. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघाचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. हा सामना मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. या मैदानावर आतापर्यंत भारताची कामगिरी कशी राहिलीय? यावर एक नजर टाकुयात.
ओल्ड ट्रेफर्ड मैदानावरील रेकॉर्ड
- ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर इंग्लंडनं आतापर्यंत 42 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 27 सामने जिंकले आहेत. तर, 14 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
- भारतानं या मैदानावर एकूण 11 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यातील पाच सामने जिंकले आहेत. तर, 6 सामने गमावले आहेत.
- ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम इंग्लंजचा माजी कर्णधार इयॉन मार्गनच्या नावावर आहे. त्यानं 13 सामन्यात 456 धावा केल्या आहेत.
- या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज इंग्लंडचा बॉब विलिस ठरला आहे. बॉबनं येथे 9 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत.
- ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर इंग्लंडनं जून 2019 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध सर्वाधिक 396 धावसंख्या उभारली आहे. तर, कॅनाडाचा संघ 45 धावांवर सर्वबाद झालाय.
- भारताचा कर्णधार रोहित शर्मानं या मैदानावर भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्मानं या मैदानावर 159 धावा केल्या आहेत.
- भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत रॉजर बिन्नी आणि व्यंकटेश प्रसाद यांचं नाव आहे. दोघांच्या नावावर 7-7 विकेट्सची नोंद आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली जात असलेली एकदिवसीय मालिका सध्या एक-एक बरोबरीत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं 10 विकेट्स राखून जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 100 धावांनी पराभव केला. ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाणारा एकदिवसीय सामना निर्णायक असेल. या सामन्यात भारत कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा-