IND vs PAK : कोण ठरणार आशिया कपचा Winner? शेन वॉटसननं केलं भाकित
IND vs PAK : आशिया कप 2022 स्पर्धेसा 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून यंदा कोण चषकावर नाव कोरेल याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटर शेन वॉटसनने भाकित केलं आहे.
![IND vs PAK : कोण ठरणार आशिया कपचा Winner? शेन वॉटसननं केलं भाकित Winner between India vs Pakistan will be Asia Cup 2022 Winner says Shane Watson IND vs PAK : कोण ठरणार आशिया कपचा Winner? शेन वॉटसननं केलं भाकित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/24/f7d880485a88ac368ab4d1c85b1552ab1661353917619143_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Asia Cup 2022 : आशिया खंडातील विश्वचषकानंतरची सर्वात मानाची क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप. यंदाचा आशिया कप 2022 (Asia Cup 2022) 27 ऑगस्टपासून युएईमध्ये सुरु होणार आहे. अशामध्ये कोणता संघ कशी कामगिरी करेल? कोणत्या खेळाडूंवर अधिक धुरा असेल असे एक न अनेक प्रश्न समोर येत आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटर शेन वॉटसनने कोणता संघ जिंकेल? याबाबत भाकित केलं आहे. त्याच्या मते भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही संघातील विजेता संघच आशिया कपही जिंकेल? असं भाकित केलं आहे.
दरम्यान शेननं असं वक्तव्य करण्यामागच्या कारणाचा विचार केला असता यंदाच्या आशिया कपमधील संघामध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघच अटीतटीचे आहेत. कारण दोन्ही संघामध्ये अव्वल दर्जाजे फलंदाज, गोलंदाज आहेत. दोन्ही संघाची आशिया कपमधील आतापर्यंतची कामगिरीही चांगली आहे. त्यामुळे या दोघांमधील एकजणच सामना जिंकण्याची दाट शक्यता आहे.
कधी, कुठं रंगणार यंदीचा भारत-पाकिस्तान सामना?
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील ग्रुप सामन्यानंतर सुपर फोर सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामनाही दुबईत 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
राखीव - दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल
आशिया कपसाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)