India Vs West Indies 2nd T20: भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध (IND vs WI) दुसऱ्या टी-20 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतानं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 बरोबरी साधलीय. या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर विकेट्स गमावलेल्या रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झालीय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.


रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमांची नोंद
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट खेळताना रोहित शर्मानं सर्वाधिक 8 वेळा शून्यावर विकेट्स गमावलीय. या यादीत रोहित शर्मानंतर केएल राहुलचा क्रमाकं लागतो. केएल राहुल टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा खाते न उघडताच माघारी परतलाय. पंरतु, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची नावं आणखी एका खास यादीत येतात. रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये भारतासाठी 4 शतके झळकावली आहेत. तर, केएल राहुलनं दोन शतकं ठोकली आहेत. 


भारतानं दुसरा टी-20 सामना पाच विकेट्सनं गमावला
वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारतीय संघानं अत्यंत निराशाजनक कामगिरी करून दाखवली. वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज ओबेड मॅकॉयच्या भेदक माऱ्यापुढं भारताचा संघ डगमताना दिसला. भारताचा डाव 19.2 षटकात 138 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजच्या संघानं पाच विकेट्सनं सामना जिंकला.


टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताला पराभूत करून वेस्ट इंडीजच्या संघानं कमबॅक केलं. या मालिकेतील तिसरा सामना आज खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, या सामन्यात रात्री आठ वाजता सुरुवात केली जाणार होती. परंतु, या सामन्याच्या वेळत बदल करण्यात आलाय. हा सामना रात्री 9.30 वाजता सुरु होईल.


हे देखील वाचा-