= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG 2022 Live : डिस्कस थ्रोमध्ये भारत अपयशी डिस्कस थ्रोमध्ये भारतीय महिला पदक जिंकू शकल्या नाहीत. सीमा पुनिया आणि नवजीत कौर यांनी अनुक्रमे पाचवं आणि आठवं स्थान मिळवलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG 2022 Live : टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने पाचवं सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे. हे पदक भारताने टेबल टेनिस खेळाच्या पुरुष टीमच्या स्पर्धेत निश्चित केलं आहे. भारतीय टेबल टेनिस पुरुष संघाने अंतिम सामन्यात सिंगापूरला (India vs Singapore) मात देत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताने 3-1 च्या फरकाने सिंगापूरवर विजय मिळवला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG 2022 Live: भारत विरुद्ध इंग्लंड हॉकी सामन्यात टीम इंडिया पराभूत भारतीय महिला संघ आणि इंग्लंडमध्ये पार पडलेल्या हॉकी सामन्यात भारतीय महिला 3-1 ने पराभूत झाल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG 2022 Live: पंतप्रधानांकडून लॉन बॉल्सपदक विजेत्या महिलांचं अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन बॉल्समध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय महिलांच्या ग्रुपचं अभिनंदन करत तुमची ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी असेल असंही म्हटलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG 2022 Live: भारत- सिंगापूर पुरुष सांघिक स्पर्धेत स्कोर 1-1 कॉमनवेल्थ टेबल टेनिसच्या पुरुष सांघिक स्पर्धेत भारत आणि सिंगापूर यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं हा सामना जिंकला तर सुवर्णपदक आपल्या नावावर करु शकणार आहे. सध्या दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकल्याने स्कोर 1-1 असा आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG 2022 Live: भारताकडे आणखी एक सुवर्णपदक भारताने आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. भारतीय महिलांच्या ग्रुपने (4 खेळाडू) लॉन बॉल्स स्पर्धेत अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्य़ा संघाला 17-10 च्या फरकाने मात देत सुवर्णपदक जिंकलं आहे. आधी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला (India vs New Zealand) मात देत अंतिम फेरी गाठली आहे होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG 2022 Live: भारत- सिंगापूर पुरुष सांघिक स्पर्धेत अंतिम सामना सुरू कॉमनवेल्थ टेबल टेनिसच्या पुरुष सांघिक स्पर्धेत भारत आणि सिंगापूर यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं हा सामना जिंकला तर सुवर्णपदक आपल्या नावावर होईल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG 2022 Live: लॉन बॉलमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8-2 नं आघाडीवर महिला लॉन बॉल संघानं दक्षिण आफ्रिकेवर आपली आघाडी मजबूत केली आहे. एंड 7 संपल्यानंतर टीम इंडिया 8-2 नं पुढं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत दोन भारतीय खेळाडू मुहम्मद याहियानं मुरली श्रीशंकरसोबत 7.68 मी. सह पात्रतामध्ये 8 वं स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केलाय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG 2022 Live: श्रीहरी नटराज पुरुषांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोकच्या अंतिम फेरीसाठी अपात्र CWG 2022 Live: श्रीहरी नटराज पुरुषांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोकच्या अंतिम फेरीसाठी अपात्र ठरला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG 2022 Live: तिसऱ्या प्रयत्नात पूनम यादवनं 98 किलो वजन उचललं वेटलिफ्टिंगमधील महिलांच्या 76 किलो गटात पूनम यादव स्नॅच प्रकरात तिसऱ्या प्रयत्नात 98 किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG Live Updates: वेटलिफ्टिंगमध्ये पूनमची स्पर्धा सुरू वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 76 किलो गटात पूनमची स्पर्धा सुरू झाली आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये ती वेटलिफ्टिंगमध्ये देशाला आठवे पदक मिळवून देऊ शकते. तिने हे पदक जिंकल्यास भारताचे या स्पर्धेतील हे 10 वे पदक असेल. पूनमने यापूर्वी 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG Live Updates: भारत न्यूझीलंड यांच्यातील लॉन बॉल सामन्याला सुरुवात लॉन बॉलमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामने सुरू झाले आहेत. महिला दुहेरीत लवली चौबे आणि नयनमोनी यांचा सामना न्यूझीलंडच्या सेलिना गोडार्ड आणि कॅटलिन इंच यांच्याशी होईल. त्याचवेळी, भारताच्या तानिया चौधरी, पिंकी आणि रूपा राणी यांचा सामना न्यूझीलंडच्या निकोल, टायला ब्रूस आणि व्हॅल स्मिथ यांच्याशी आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG Live Updates: सीमा पुनिया सलग पाचवे राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील पदक जिंकण्याचा प्रयत्न ऍथलेटिक्समध्ये महिला डिस्कस थ्रोअर सीमा पुनिया सलग पाचवे राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील पदक जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. या वेळी एक कांस्य आणि चार रौप्य पदकांसह 39 वर्षीय सुवर्णपदक जिंकण्यासाठी उत्सुक असेल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG Live Updates: पुरुष टेबल टेनिस संघ सुवर्णपदकासाठी सिंगापूरशी लढणार पुरुषांच्या टेबल टेनिस संघानेही उपांत्य फेरीत नायजेरियाचा पराभव करून बाहेरचा रस्ता दाखवला. आता मंगळवारी या संघाची सुवर्णपदकासाठी सिंगापूरशी लढत होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG Live Updates: सुवर्णपदकासाठी भारतीय मिश्र बॅडमिंटन संघ मैदानात उतरणार भारतीय मिश्र बॅडमिंटन संघ एनईसीमध्ये खडतर मलेशियन संघाविरुद्ध आपलं विजेतेपद राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत सारखे खेळाडू एकेरी आणि दुहेरीच्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी संघाला सुवर्णपदक जिंकताना पाहण्यासाठी खूप उत्सुक असतील.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
CWG Live Updates: भारतीय लॉन्स बॉल्स संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रूपा तिर्की या चार सदस्यीय महिला लॉन बॉल्स संघानं त्यांच्या पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवून इतिहास रचला आहे. हा संघ सुवर्णपदकासाठी दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.