IND vs WI T20, Highlights : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. वेस्ट इंडीजने 5 विकेट्सने मिळवलेल्या या विजयासोबत मालिकेत 1-1 ची बरोबरी साधली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने गोलंदाजी घेतली. ज्यानंतर ओबेद मकॉय याने अप्रतिम गोलंदाजी करत सहा भारतीयांना तंबूत धाडलं आणि ज्यामुळे भारत केवळ 138 धावाच करु शकला. या धावा वेस्ट इंडीजने सलामीवीर ब्रँडन किंगच्या अर्धशतकाच्या मदतीने सहज पूर्ण करत सामना जिंकला.


सामन्यात सर्वप्रथम वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी यावेळी घेतला जो संघातील गोलंदाजांनी योग्य असल्याचं अगदी पहिल्या चेंडूपासून दाखवलं, यावेळी सर्वात पहिल्या चेंडूवर भारताचा कर्णदार रोहितला तंबूत धाडण्यात आलं. नंतर भारताचे बहुतेक फलंदाज पटापट तंबूत परतत होते. हार्दीक पांड्याने सर्वाधिक 31 रन केले. तर जाडेजा आणि पांड्या यांनी अनुक्रमे 27 आणि 24 रन केले. ज्यामुळे भारत 19.4 षटकात 138 रनच करु शकला. वेस्ट इंडीजच्या सर्वच गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली. पण आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ओबेद मकॉय याने यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत तब्बल सहा विकेट्स घेतले. त्याच्याशिवाय जेसन होल्डरने दोन आणि अल्झारी जोसेफ आणि अकेल हुसेनने एक-एक विकेट घेतली.


अवघ्या 139 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीजचा सलामीवीर ब्रँडन किंग याने सुरुवातीपासून अप्रतिम फटकेबाजी केली. त्याने 68 धावा करत एक अप्रतिम अर्धशतक झळकावलं. पण विजयासाठी काही धावा शिल्लक असताना तो बाद झाला. त्यानंतर मात्र डेवॉन थॉमस याने नाबाद 31 धावांची खेळी करत वेस्ट इंडीजला 5 विकेट्सनी विजय मिळवून दिला. 


हे देखील वाचा-