PM Modi On World Wrestling Championship (U-17): जागतिक कुस्ती स्पर्धेत 17 वर्षाखालील भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. ज्यामुळं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विटर माध्यमातून जागतिक कुस्ती स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलं. "भारताला एकूण 14 पदक मिळाली आहेत. त्यापैकी सात सुवर्णपदक आहेत. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारतीय महिलांनी 5 सुवर्णपदक जिंकली आहेत. पदकतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर राहिला", असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय.


नरेंद्र मोदींकडून भारतीय खेळाडूंचं कौतूक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, "ग्रीको रोमनमध्ये भारतानं 32 वर्षानंत सुवर्णपदक जिंकलं. ही खूप मोठी उपलब्धी आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केलीय. याशिवाय, भारत पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिला, आमच्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन."


पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट-



महिला खेळाडूंचं दमदार प्रदर्शन
जागतिक कुस्ती स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत अव्वल स्थानी राहिला. मात्र, यामागचं सर्व श्रेय भारतीय महिलांना जातंय. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सर्वाधिक 14 पदकं जिंकली. भारतीय खेळाडूंनी 7 सुवर्णपदकं जिंकली. त्याचबरोबर यावेळी महिला खेळाडूंनीही  शानदार खेळ करत चाहत्यांची मनं जिंकली. या स्पर्धेत भारतीय महिलांना पाच पदकं जिंकली आहेत. 


हे देखील वाचा-