Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिगहॅम (Birmingham) येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आज पाचवा दिवस असून चौथ्या दिवशीच्या खेळानंतर पदकतालिकेत मोठा फेरबदल पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवशीही राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वल स्थान राखलंय. दरम्यान, भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं काल कांस्यपदक जिंकलं. ज्यामुळं भारताच्या पदकांच्या संख्येत भर पडली. कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 च्या पदकतालिकेत कोणता संघ कितव्या क्रमांकावर आहे? हे जाणुन घेऊयात. 

Continues below advertisement

राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 31 सुवर्णपदकासह एकूण 71 पदकं जिंकली आहेत. तर, 21 सुवर्णपदकासह एकूण 54 पदक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पदकतालिकेत न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या खात्यात आतापर्यंत 13 सुवर्णपदकासह एकूण 24 पदकं आहेत. याशिवाय, चौथ्या क्रमांकावर कॅनडा( 6 सुवर्ण, एकूण 33 पदक), पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (5 सुवर्ण, एकूण 12 पदक), सहाव्या क्रमांकावर भारत (3 सुवर्ण पदक, एकूण 9 पदक), सातव्या क्रमांकावर स्कॉटलँड (2 सुवर्ण, एकूण 23 पदक), आठव्या क्रमांकावर मलेशिया (2 सुवर्ण, एकूण 6 पदक), नवव्या क्रमांकावर नायजेरिया (2 सुवर्ण, एकूण 4 पदक) आणि दहाव्या क्रमांकावर वेल्स (1 सुवर्ण, एकूण 10 पदक). 

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 पदकतालिका-

क्रमांक देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 ऑस्ट्रेलिया 32 20 20 71
2 इंग्लंड 21 22 11 54
3 न्यूझीलंड 13 07 04 24
4 कॅनडा 06 11 16 33
5 दक्षिण आफ्रिका 05 03 04 12
6 भारत 03 03 03 09
7 स्कॉटलँड 02 08 13 23
8 मलेशिया 02 02 02 06
9 नायजेरिया 02 00 02 04
10 वॉल्स 01 02 07 10
 

सुवर्णपदकासाठी भारतीय मिश्र बॅडमिंटन संघ मैदानात उतरणार
याशिवाय, भारतीय मिश्र बॅडमिंटन संघ एनईसीमध्ये खडतर मलेशियन संघाविरुद्ध आपलं विजेतेपद राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत सारखे खेळाडू एकेरी आणि दुहेरीच्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी संघाला सुवर्णपदक जिंकताना पाहण्यासाठी खूप उत्सुक असतील.

पुरुष टेबल टेनिस संघ सुवर्णपदकासाठी सिंगापूरशी लढणार
पुरुषांच्या टेबल टेनिस संघानेही उपांत्य फेरीत नायजेरियाचा पराभव करून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर भारत आणि सिंगापूर यांच्यात आज सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे. 

हे देखील वाचा-