एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs WI, 1st ODI Result : भारताचा वेस्ट इंडीजवर 3 धावांनी विजयी, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
IND vs WI : भारताने वेस्ट इंडीजवर मिळवलेल्या या विजयाने भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामना भारताने जिंकला असला तरी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी मात्र एक दमदार अशी झुंज दिली.
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत 3 धावांनी जिंकला. मालिकेतील पहिलाच सामना जिंकल्याने भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर आधी फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावा करायच्या होत्या. पण वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले. ज्यामुळे भारत 3 धावांनी सामन्यात विजयी झाला, तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs WI 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आज मात्र नाणेफेक जिंकूनही वेस्ट इंडीजला सामना जिंकता आला नाही. पण वेस्ट इंडीजने दिलेली कडवी झुंज उत्तम होती.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावा करायच्या होत्या. पण वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले.
- नाणेफेक जिंकत प्रथम वेस्ट इंडीजने गोलंदाजी घेतली.
- फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारताने सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी सुरु केली. शिखर आणि शुभमन जोडीने दमदार फलंदाजी करत शतकी भागिदारी पूर्ण केली. संघाच्या 119 धावा झाल्या असताना शुभमन 64 धावांवर धावचीत झाला. त्यानंतर शिखर 97 धावा करुन तंबूत परतला.
- मग श्रेयसने सर्व जबाबदारी घेतली. पण तो देखील 54 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर मात्र पुढील सर्व फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. हुडा (27) आणि अक्षर पटेल (21) यांनी काहीशी फिनिशिंग करत धावसंख्या पुढे नेली.
- वेस्ट इंडीजला 309 धावा जिंकण्यासाठी करणं अनिवार्य होतं. वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश मोटे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर रोमारियो शेफर्ड आणि अकेल हुसेन यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.
- 309 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीजने सुरुवात उत्तम केली. कायल मायर्सने 75 एस. ब्रुक्सने 46 धावा करत चांगली सुरुवात केली.ब्रँडन किंगनेही 54 धावा करत अर्धशतक झळकावलं. त्यामुळे वेस्ट इंडीजची धावसंख्या चांगली वाढली होती. पण विजयासाठी अजूनही धावांची गरज असतान सेट फलंदाज बाद होत गेले.
- पण अखेरच्या षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या रोमारीयो शेफर्ड आणि अकेल हुसेन यांनी तुफान फटकेबाजी केली. पण केवळ 3 धावा कमी पडल्याने ते संघाला विजय मिळवू देऊ शकले नाहीत.
- रोमारियोने नाबाद 39 तर अकेलने नाबाद 33 धावा केल्या. भारताकडून चहल, ठाकूर आणि सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
- सामन्यात 97 धावांची दमदार खेळी करणारा भारताचा कर्णधार शिखर धवन सामनावीर ठरला.
हे देखील वाचा-
- IND vs WI, 1st ODI Result : रोमहर्षक सामन्यात भारत 3 धावांनी विजयी, वेस्ट इंडीजची झुूंज व्यर्थ
- Team India : शिखर धवन कर्णधार होताच टीम इंडियाचा नकोसा विक्रम, श्रीलंकेच्या 5 वर्षे जुन्या रेकॉर्डची बरोबरी
- Yonex Taipei Open 2022: भारताची मिश्र दुहेरी जोडी तनीषा क्रास्टो-इशान भटनागर यांचं आव्हान संपुष्टात!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement