Yuvraj Singh on Commentary : त्या लोकांमुळे मी कधीच कमेंट्री करणार नाही...; युवराज सिंगच्या एका वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, मनातलं सगळं बोलून गेला
Yuvraj Singh on Commentary : सौरव गांगुली सुद्धा अधूनमधून कमेंट्री बॉक्समध्ये दिसतात. मात्र युवराज सिंग हे एक मोठं नाव आहे, जे या क्षेत्रापासून दूर राहतात.

Yuvraj Singh on Commentary : हरभजन सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, आकाश चोप्रा आणि पार्थिव पटेल यांसारखे अनेक माजी क्रिकेटपटू निवृत्तीनंतर समालोचन (कमेंट्री) क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. अगदी ‘दादा’ सौरव गांगुली सुद्धा अधूनमधून कमेंट्री बॉक्समध्ये दिसतात. मात्र युवराज सिंग (Yuvraj Singh) हे एक मोठं नाव आहे, जे या क्षेत्रापासून दूर राहतात. युवराज सिंग याने स्वतः यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. त्याने सांगितलं की काही लोकांनी त्याच्या विषयी वैयक्तिक (पर्सनल) टीका केली होती, आणि हीच मोठी कारणं आहेत ज्यामुळे तो कमेंट्री करण्याचं टाळतात.
युवराज सिंग मनातलं सगळं बोलून गेला...
युवराज म्हणाला की, “आता मी निवृत्त झालो आहे, त्यामुळे मी यावर मोकळेपणाने बोलू शकतो. काही लोकांनी माझ्याबद्दल चर्चा केली, पण ती क्रिकेटबद्दल नव्हती, तर वैयक्तिक पातळीवर होती. क्रिकेटवर किंवा सामन्यावर भाष्य करणं योग्य आहे, पण जेव्हा गोष्ट वैयक्तिक स्तरावर जाते, तेव्हा त्या गोष्टी लक्षात राहतात. ज्यांनी माझ्याबद्दल वैयक्तिक टिप्पणी केली, त्यांच्यासोबत मला बसायचं नाही. त्यामुळेच मी कमेंट्री करत नाही.” युवराज याने कोणाचंही नाव घेतलं नाही, पण काही निवडक लोकांमुळेच तो या क्षेत्रापासून दूर असल्याचं त्याने स्पष्ट केलं.
निवृत्तीनंतर युवराज सिंग अनेक युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करताना दिसला आहेत. विशेषतः अभिषेक शर्मासोबत त्याने काम केलं असून, अभिषेक सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी कामगिरी करत आहेत. याशिवाय संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांनाही त्याने मार्गदर्शन केल्याचं पाहायला मिळालं आहे.
युवराजने थेट धोनी आणि कपिल देवची मागितली माफी...
दरम्यान, युवराज सिंगने टीम इंडियाला विश्वविजेता करणारे महान क्रिकेटपटू कपिल देव आणि माजी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यांची माफी मागितली आहे. ही माफी युवराजचे वडील योगराज सिंग यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर आली आहे. योगराज सिंग यांनी धोनीवर युवराजला भारतीय संघातून बाहेर काढल्याचा आरोप बऱ्याच काळापासून केला आहे.
हे ही वाचा -




















