Virat Kohli News : सगळंच टॉप क्लास, तरी शंका?, विराट कोहलीच्या भविष्याबाबत प्रश्न विचारताच कोच संतापला, नेमकं काय म्हणाला?
Virat Kohli 2027 ODI World Cup plans : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने एक ‘क्लासिक’ पारी खेळली.

Batting Coach Sitanshu Kotak on Virat Kohli Future : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने एक ‘क्लासिक’ पारी खेळली. कोहलीने अवघ्या 120 चेंडूंमध्ये 135 धावा ठोकत 11 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला. खास म्हणजे, विराटची ही खेळी अशा वेळी आली आहे जेव्हा त्याच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकतेच एका अहवालात म्हटले होते की मालिकेनंतर बीसीसीआय विराट आणि रोहितच्या भविष्यावर चर्चा करणार आहे. पण या शतकी खेळीनंतर चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे. यावरच भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी विराटच्या भविष्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
A leap of joy ❤️💯
— BCCI (@BCCI) November 30, 2025
A thoroughly entertaining innings from Virat Kohli 🍿
Updates ▶️ https://t.co/MdXtGgRkPo#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @imVkohli pic.twitter.com/llLByyGHe5
सीतांशू कोटक यांनी विराटचे केले कौतुक...
विराट कोहली 37 वर्षांचा झाला असला तरी त्याच्या कामगिरीत कोणताही बदल झाला नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्ध तो चांगल्या लयीत दिसतो. तब्बल 9 महिन्यांनी भारतात इंटरनॅशनल सामना खेळूनही त्याने मोठी खेळी साकारली. रोहित शर्मासोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी 136 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. विराटच्या या खेळीचे कौतुक करताना कोटक म्हणाले, “ही एक अप्रतिम इनिंग होती. त्याने केवळ वनडेमध्येच नाही, तर सर्वच फॉर्मेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.”
विराटच्या भविष्याबद्दल मोठे विधान
वर्ल्ड कप 2027 मध्ये विराट खेळतील का, असा प्रश्न कोटक यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “मला कळत नाही आपण अशा गोष्टींवर चर्चा का करतो. तो चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या भविष्यासंबंधी प्रश्नच उरत नाही. त्याची फिटनेस, त्याचा खेळ… सगळंच टॉप क्लास आहे, यात शंका नाही.” म्हणजेच, फलंदाजी प्रशिक्षकांच्या या वक्तव्यानंतर विराटच्या भविष्याबद्दल उठणाऱ्या सर्व चर्चांना मोठा ब्रेक लागला आहे.
रोहित शर्मानेही दाखवली धमक
विराट कोहलीसोबतच कर्णधार रोहित शर्माही या सामन्यात चमकला. त्याने 51 चेंडूंमध्ये 57 धावा करत 5 चौकार आणि 3 षटकार फटकारले. त्याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तो प्लेअर ऑफ द सीरीज ठरला होता. त्यामुळे त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी आणि भारतीय चाहत्यांसाठीही आनंदाची बातमी आहे. येणारे सामने भारतासाठीच नाही, तर विराट आणि रोहितसारख्या अनुभवी खेळाडूंसाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
हे ही वाचा -





















