Sunil Gavaskar IND vs SA : उपकार विसरला, जर BCCI नसते तर कोणीही खेळले नसते..., सुनील गावसकर संतापले, दक्षिण आफ्रिकेच्या कोचसोबत सगळ्यांची घेतली खरडपट्टी
Sunil Gavaskar on South Africa coach News : माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांच्या वादग्रस्त टिप्पणीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Sunil Gavaskar slams South Africa coach Shukri Conrad : माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांच्या वादग्रस्त टिप्पणीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गुवाहाटी टेस्टदरम्यान कॉनराड यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या या वक्तव्यावर गावसकरांनी जोरदार टीका केली असून, त्यांनी याला “अविवेकपूर्ण” टिप्पणी म्हटले आहे. गावसकरांचे म्हणणे आहे की, कॉनराड यांनी आपली चूक मान्य करून त्यावर सुधारणा करावी.
दक्षिण आफ्रिका संघाचे कोच शुक्री कॉनराड काय म्हणाले होते? (Shukari Conard On Team India)
दक्षिण आफ्रिकेने भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केले. बारसापारा स्टेडियमवरील दुसऱ्या कसोटीदरम्यान कॉनराड यांना विचारण्यात आले की 288 धावांची भक्कम आघाडी असूनही त्यांनी फॉलोऑन का दिला नाही. यावर त्यांनी उत्तर दिले, “भारताला शक्य तितका वेळ मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उभं ठेवायचं, थकवायचं हेच आमचं लक्ष्य होतं. एक प्रसिद्ध वाक्य वापरायचं तर, भारतीय संघाने अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण घालावं. आम्हाला त्यांना सामन्यात परतण्याची कोणतीच संधी द्यायची नव्हती”
सुनील गावसकर संतापले
या वक्तव्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही देशांतील क्रिकेट जाणकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिओहॉटस्टारच्या ‘क्रिकेट लाइव्ह’ कार्यक्रमात गावसकर म्हणाले की, अशा शब्दांचा वापर करणे योग्य ठरत नाही, विशेषत: भारत आणि बीसीसीआय यांनी दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे आणि दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून मजबूत क्रिकेट संबंध आहेत.
सुनील गावसकर काय म्हणाले?
गावसकर म्हणाले, “तुम्ही म्हणू शकता की हा शब्द चुकीच्या पद्धतीने वापरला गेला. आपल्याला दक्षिण अफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची आठवण ठेवायला हवी. बीसीसीआयच्या पुढाकारामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश मिळाला. त्यांचा पहिला पुनरागमन सामना भारतातच झाला होता.”
पूर्व भारतीय फलंदाज पुढे म्हणाले की, ते कॉनराडकडून माफीची अपेक्षा करत नाहीत, परंतु पुढील पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या टिप्पणीबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि ती टिप्पणी थोडी जास्त झाली याची कबुली द्यावी, अशी त्यांना अपेक्षा आहे.
🗣 #SunilGavaskar has his say about the South African coach Shukri Conrad's infamous remark during the Test series! #INDvSA 1st ODI, LIVE NOW 👉 https://t.co/BBkwein9oF pic.twitter.com/5x5AUqMn0F
— Star Sports (@StarSportsIndia) November 30, 2025
हे ही वाचा -





















