Shubman Gill News : काळे मोजे शुभमन गिलचा घात करणार? इंग्लिश मीडियाने रान उठवलं, ICC कारवाईच्या तयारीत! जाणून घ्या प्रकरण
Shubman Gill Black Socks : कसोटी सामन्यात काळे मोजे घालण्याबद्दल एखाद्या खेळाडूला शिक्षा झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का?

England vs India 1st Test : कसोटी सामन्यात काळे मोजे घालण्याबद्दल एखाद्या खेळाडूला शिक्षा झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? पण शुक्रवारी लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिल काळ्या मोजे घालून मैदानावर आला, जे आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन आहे.
भारतीय कर्णधार शुभमन गिलने शुक्रवारी लीड्सच्या पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी केली आणि त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. तो 127 धावांवर नाबाद आहे. कर्णधार म्हणून कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो सहावा भारतीय ठरला. आशियाबाहेर हे त्याचे पहिलेच शतक होते. गिल व्यतिरिक्त, ऋषभ पंत 65 धावांवर नाबाद आहे, तर यशस्वी जैस्वाल 101 धावा करून बाद झाला. त्याच वेळी, साई सुदर्शन खाते उघडू शकला नाही, तर केएल राहुलने 42 धावांची खेळी खेळली.
How many of you have been fined for wearing black socks before? 😅 pic.twitter.com/CMf1BN8lG0
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 20, 2025
गिलने आयसीसीचा कोणता नियम मोडला?
कर्णधारपदाची चांगली सुरुवात असूनही गिलला आयसीसीच्या कपड्यांच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्याच्या पहिल्या दिवसाच्या डावात काळे मोजे घालण्यामुळे संभाव्य उल्लंघन होऊ शकते. आयसीसीच्या या नियमांनुसार खेळाडूंना सामन्यादरम्यान फक्त पांढरे, क्रीम किंवा हलके राखाडी रंगाचे मोजे घालावे लागतात. MCC नियम 19.45 मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, या रंगांव्यतिरिक्त, गडद रंगाचे मोजे घालण्यास परवानगी नाही. हा नियम 2023 मध्ये लागू करण्यात आला आणि तेव्हापासून जवळजवळ सर्व खेळाडू त्याचे पालन करत आहेत. स्काय स्पोर्ट्सने गिलने काळे मोजे घातले आहेत याबद्दल ट्विट केले आहे.
गिलवर कारवाई करण्याचा निर्णय कोण घेणार?
गिलवर बंदी घालण्याचा निर्णय मॅच रेफरीवर अवलंबून आहे. त्यांना हे ठरवावे लागेल की हा मुद्दाम लेव्हल-वन गुन्हा होता की नाही. जर असे झाले तर गिलला त्याच्या मॅच फीच्या 10 ते 20 टक्के दंड होऊ शकतो. पण, जर त्याचे उल्लंघन चुकून असेल... तर तो कोणत्याही प्रकारच्या शिक्षेपासून वाचू शकतो. आता मॅच रेफरी रिची रिचर्डसन यावर काय निर्णय घेतात हे पाहणे बाकी आहे.
हे ही वाचा -





















