एक्स्प्लोर

Sanju Samson in Hospital : हाताला सलाईन अन्...; हॉस्पिटलच्या बेडवर संजू सॅमसन, अचानक काय झालं? टीम इंडिया टेन्शनमध्ये

भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन याच्याबाबत आशिया कपपूर्वी एक चिंताजनक बातमी समोर आली

Why Sanju Samson in Hospital : भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन याच्याबाबत आशिया कपपूर्वी एक चिंताजनक बातमी समोर आली. त्याची पत्नी चारुलता हिने हॉस्पिटलच्या बेडवर संजू सॅमसन झोपलेला आणि हाताला सलाईन असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि क्षणात चाहत्यांची धाकधूक वाढली. अचानक स्टार खेळाडू हॉस्पिटलमध्ये कसा काय, नेमकं झालं तरी काय? असा प्रश्न सर्वांना पडला.

संजू सॅमसनला अचानक काय झालं?  

मात्र दिलासादायक बाब म्हणजे, जास्त काही नव्हते. थोडा त्रास झाल्याने सॅमसनला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं. संध्याकाळी तो लगेचच पुन्हा मैदानावर परतला आणि सामन्यातही उतरला. त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाही. आशिया कप सुरू होण्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

आशिया कप 2025 साठी संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये या स्पर्धेची सुरुवात होणार असून 28 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेच्या काही आठवडे आधीच संजूच्या प्रकृतीबद्दल ही माहिती बाहेर आली. 

चारुलथाने 21 ऑगस्ट दुपारी 3 वाजता संजू रुग्णालयात असल्याचं इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सांगितलं. पण त्याच रात्री तो केरळ क्रिकेट लीग (KCL 2025) मध्ये मैदानात उतरला. आपल्या कोची ब्ल्यू टायगर्स संघाकडून खेळताना त्याने आदानी तिरुवनंतपुरम रॉयल्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. सॅमसनला फलंदाजीची संधी न मिळाली तरीही तो संध्याकाळी 7.45 वाजता झालेल्या सामन्यात मैदानावर होता.

मिळालेल्या माहितीनुसार, संजू सॅमसनला ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. सावधगिरीचा उपाय म्हणून तो रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर तो थेट सामना खेळून पुन्हा रुग्णालयात गेला. सध्या तो घरी असून तब्येत पूर्वीपेक्षा चांगली आहे. 
Sanju Samson in Hospital : हाताला सलाईन अन्...; हॉस्पिटलच्या बेडवर संजू सॅमसन, अचानक काय झालं? टीम इंडिया टेन्शनमध्ये

आशिया कप 2025 साठी भारताचा संघ (Team India Squad For Asia Cup 2025) :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग. 

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जैस्वाल, प्रसीद कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि ध्रुव जुरेल. 

हे ही वाचा - 

Team India : आशिया कपपूर्वी बीसीसीआयचे धक्कातंत्र! 15 वर्षांपासून संघात असलेल्या मेंबरला दाखवला बाहेरचा रस्ता, जाणून घ्या कारण

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
Embed widget