BCCI Annual Contract List : टी-20 नंतर कसोटीतून निवृत्ती, मग A+ ग्रेडमधून बाहेर जाणार रोहित अन् विराट? बीसीसीआयने दिली मोठी अपडेट
Virat Kohli Rohit Sharma Test Retirement : टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बराच काळ चमकदार कामगिरी केली.

Virat Kohli Rohit Sharma Test Retirement : टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बराच काळ चमकदार कामगिरी केली. पण आता या दोन्ही खेळाडूंनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे, त्यानंतर हे दोघेही फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील. बीसीसीआयने काही काळापूर्वी केंद्रीय कराराची घोषणा केली होती. त्यानुसार, विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना बीसीसीआयने ए+ श्रेणीत स्थान दिले. त्यानुसार, खेळाडूंना दरवर्षी 7 कोटी रुपये दिले जातील. पण आता कोहली आणि रोहितने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे, तर या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयच्या ए+ श्रेणीतून वगळले जाईल का?
ग्रेड A+ मध्ये रोहित आणि कोहली होणार बाहेर?
या प्रकरणावर बीसीसीआयकडून नवीन अपडेट समोर आले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, कोहली आणि रोहित आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत असले तरी त्यांचा दर्जा कमी होणार नाही. ते म्हणाले की, "जरी रोहित आणि कोहलीने टी-20 नंतर कसोटीतून निवृत्ती जाहीर केली असली तरी ते अजूनही भारतीय क्रिकेटचा भाग आहेत. त्यामुळे, दोघांनाही केंद्रीय कराराच्या ग्रेड ए+ ची सुविधा मिळत राहील."
बीसीसीआयने गेल्या महिन्यात केंद्रीय करारांची घोषणा केली होती. या करारात एकूण 34 खेळाडूंना स्थान देण्यात आले. चार खेळाडूंना (विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह) ग्रेड ए+ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. आता विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले असले तरी, या दोन्ही खेळाडूंना A+ श्रेणीतून वगळण्यात येणार नाही.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटला दिला निरोप
भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 7 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटला निरोप दिला होता. त्यानंतर, पाच दिवसांतच 12 मे 2025 रोजी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळताना दिसतील. भारत पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आता संघात रोहित आणि कोहलीची जागा कोणता खेळाडू घेतो हे पाहणे बाकी आहे.
हे ही वाचा -





















