क्रिकेट सोडून इनकम टॅक्स ऑफिसर झाला खेळाडू, विराट कोहलीसोबत खास कनेक्शन!
दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विराटच्या संघानं चषकावर नाव कोरलं होतं, या विजयाचा शिल्पकार सध्या इनकम टॅक्स ऑफिसर म्हणून काम पाहतोय.
विराट कोहलीच्या नेतृत्वातील अंडर 19 भारतीय संघानं चषकावर नाव कोरलं होतं. 2008 मधील अंडर 19 संघातील विराट कोहली, रवींद्र जडेजा, मनीष पांडे आणि सौरभ तिवारी यांनी आतंरराष्ट्रीय संघात पदार्पण केले. त्याशिवाय या खेळाडूंनी आयपीएलमध्येही नाव कमावलं. या संघातील कोणते खेळाडू काय करतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विराटच्या संघानं चषकावर नाव कोरलं होतं, या विजयाचा शिल्पकार सध्या इनकम टॅक्स ऑफिसर म्हणून काम पाहतोय. होय, अंडर 19 च्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेला अजितेश अर्गल सध्या इनकम टॅक्स ऑफिलर म्हणून काम पाहतोय. 2008 वर्ल्ड कप फायनलध्ये अजितेश अर्गल यानं 5 षटकांत फक्त सात धावा देत दोन महत्वाच्या विकेट घेतल्या होत्या. 2008 मध्ये अजितेश अर्गल याला पंजाब संघाने आपल्या ताफ्यात घेतले होते. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यानंतर तो गायब झाला, खूप कमी जणांना तो काय करतो हे माहित आहे. तो सध्या इनकम टॅक्स ऑफिसर म्हणून काम करतोय.
इनकम टॅक्स ऑफिसर झाला अजितेश अर्गल
विश्वचषकातील शानदार कामगिरीनंतर पंजाब किंग्सने अजितेश अर्गल याला आपल्या ताफ्यात घेतलं. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. अजितेश शर्मा याला स्पोर्ट्स कोट्यातून इनकम टॅक्स ऑफिसर म्हणून नोकरी मिळाली. तो मागील काही वर्षांपासून आयटी ऑफिसर म्हणून काम करत होता. पण तो आता क्रिकेटच्या मैदानावर परत येतोय. पण खेळाडू म्हणून नाही तर पंच म्हणून तो काम करणार आहे. अजितेश अर्गल मध्य प्रदेशचा आहे, त्यानं नुकतीच अंपायरिंगची परीक्षा पास केली आहे. अजितेश शर्मा याच्याशिवाय 2008 अंडर 19 संघातील तन्मय श्रीवास्तव यानेही अंपायरिंगची परीक्षा पास केली आहे. अजितेश अर्गल आणि तन्मय श्रीवास्तव हे ऑगस्टमध्ये बीसीसीआयच्या ओरिएंटेशन प्रोग्राम आणि सेमिनारला हजेरी लावणार आहेत.
2008 अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप फायनलचा होरो राहिला अजितेश
2008 मध्ये विराट कोहलीच्या संघाने अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरले होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 2 मार्च रोजी अंतिम सामना झाला होता. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना फक्त 159 धावा केल्या होत्या. भारतीय संघानं हा सामना डकवर्थ लुईस नियमांनुसार 12 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिका संघाला 25 षटकांमध्ये फक्त 8 बाद 103 धावाच केल्या. या सामन्यात अजितेश अर्गल यानं भेदक मारा केला होता. अजितेश अर्गल यानं पाच षटकांमध्ये फक्त सात धावा देत महत्वाच्या दोन विकेट घेतल्या. या शानदार कामगिरीमुळे अजितेश शर्मा याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.