नवा फॉर्म्युला, नवा थरार! बीसीसीआयचा मोठा निर्णय, भारतीय देशांतर्गत क्रिकेटचा सिस्टम केला अपग्रेड, काय बदल झाला?
बीसीसीआयने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे

BCCI Domestic Cricket Format Changes : बीसीसीआयने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दुलीप ट्रॉफी पुन्हा जुन्या स्वरूपात आणली जाणार असताना, रणजी ट्रॉफी 2025-26 (Ranji Trophy Start Date) ची सुरुवात तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. रणजी ट्रॉफी 15 ऑक्टोबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत दोन टप्प्यात खेळली जाईल. त्याच वेळी 2026 मध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यानंतर एका संघाला पुढील हंगामासाठी बढती दिली जाईल, तर एका संघाला डिमोशन केले जाईल.
2018-19 च्या हंगामात बीसीसीआयने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) 9 नवीन संघांचा समावेश केला, ज्यामध्ये ईशान्य संघाचा समावेश होता. या निर्णयामुळे देशांतर्गत स्तरावर खेळल्या जाणाऱ्या प्रीमियम क्रिकेटच्या पातळीवर परिणाम झाला आहे. गेल्या हंगामात, मेघालयने रणजी ट्रॉफी एलिट डिव्हिजनमध्ये आपले सर्व सात सामने गमावले. हा बदल रेड बॉल क्रिकेटमधील सर्व वयोगटातील क्रिकेट स्पर्धांना लागू होईल. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2025-26 हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि पहिला टप्पा 19 नोव्हेंबरपर्यंत खेळवला जाईल. नॉकआउट सामने 6 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान खेळवले जातील.
🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) June 14, 2025
BCCI convened its 28th Apex Council Meeting on Saturday and made the following key decisions 👇
🔹 A committee to be constituted to formulate comprehensive guidelines aimed at preventing occurrences similar to the victory celebrations in Bengaluru. The committee will… pic.twitter.com/FXEqMO5gU4
दुलीप ट्रॉफीमध्ये बदल
मागील हंगामात दुलीप ट्रॉफीमधील (Duleep Trophy) संघांना इंडिया अ, इंडिया ब, इंडिया क आणि इंडिया ड अशी नावे देण्यात आली होती. आता झोनच्या आधारावर संघ दुलीप ट्रॉफीमध्ये परतत आहेत. याचा अर्थ असा की, आगामी हंगामात इंडिया वेस्ट, इंडिया ईस्ट, इंडिया साउथ, इंडिया नॉर्थ, इंडिया सेंट्रल आणि इंडिया नॉर्थ ईस्टमधील संघ दुलीप ट्रॉफीमध्ये खेळतील. दुलीप ट्रॉफी 28 ऑगस्टपासून सुरू होईल आणि महिला इंटर-झोन मल्टी-डे ट्रॉफी 3 एप्रिल 2026 रोजी संपेल.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) आणि सिनियर महिला टी-20 ट्रॉफीमध्ये नॉकआउट स्टेजऐवजी सुपर लीग स्टेज जोडला जात आहे. विजय हजारे ट्रॉफी, सिनियर महिला एकदिवसीय ट्रॉफी आणि पुरुषांच्या 23 वर्षांखालील राज्य-अ ट्रॉफीमध्ये 4 एलिट ग्रुप आणि एक प्लेट ग्रुप मॉडेल लागू केले जाईल.
हे ही वाचा -





















