महिला वर्ल्ड कपमध्ये बेबी सेलिब्रेशन, एफी फ्लेचरचा व्हिडीओ व्हायरल
West Indies Women vs Bangladesh Women : न्यूझीलंडमध्ये सध्या महिला विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकामध्ये महिला खेळाडू जिवाचं रान करुन खेळत आहेत.
West Indies Women vs Bangladesh Women : न्यूझीलंडमध्ये सध्या महिला विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकामध्ये महिला खेळाडू जिवाचं रान करुन खेळत आहेत. विजयानंतर अथवा विकेट घेतल्यावर किंवा तुफानी फलंदाजीनंतर प्रत्येक खेळाडू हटके सेलिब्रेशन करत असतो. पण वेस्ट इंडिजच्या एफी प्लेचर हिने केलेल्या सेलिब्रेशनची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. एफी प्लेचर हिने केलेले बेबी सेलिब्रेशन सध्या चर्चेचा विषय आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयसीसीनेही सोशल मीडियावर एफी प्लेचरचा व्हिडीओ पोस्ट केलाय.
वेस्ट विडिंजचा संघ आपल्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनसाठी ओळखला जातो. पुरुष संघाप्रमाणे महिला संघातील खेळाडूंचं सेलिब्रेशनही चर्चेचा विषय आहे. वेस्ट विंडिजची महिला खेळाडू एफी फ्लेचर हिने बांग्लादेशविरोधातील सामन्यात एका नव्या अंदाजात सेलिब्रेशन केलेय. एफी हिचं बेबी सेलिब्रेशन सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे, हा व्हिडीओ भन्नाट व्हायरल होत आहे.
महिला विश्वचषकात वेगवेगळ्या देशातील महिला संघानी सहभाग घेतला आहे. काही संघातील महिला खेळाडूंनी तर आई झाल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलेय. पाकिस्तानची कर्णधार बिसमाह महरूफ हे त्यामधीलच एक नाव. नुकतेच बिसमाह महरुफ हिने तुफानी फलंदाजी केल्यानंतर बेबी सेलिब्रेशन केले होते. पण आता वेस्ट विंडिजच्या फ्लेचरने वेगळ्या अंदाजात बेबी सेलिब्रेशन केले. हा व्हिडीओ भन्नाट व्हायरल झालाय.
फ्लेचरचा सात महिन्याचा मुलगा आहे. फ्लेचरने बांगलादेशविरोधात दहा षटकांत 29 धावा देत तीन विकेट घेतल्या. लागोपाठ दोन सामन्यात दोन विकेट घेतल्यानंतर फ्लेचर बेबी सेलिब्रेशन केले. पाहा व्हिडीओ..
View this post on Instagram
View this post on Instagram
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live