Watch Video: क्रिकेटर म्हणावं की सुपरवूमन! मॅडी ग्रीनचा अप्रतिम झेल पाहून समालोचकासह प्रेक्षकही आश्चर्यचकित!
ICC Womens World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकाच्या 11 व्या सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगला.
ICC Womens World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकाच्या 11 व्या सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघानं न्यूझीलंडसमोर 270 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला केवळ 141 धावांपर्यंत मजल मारता आली. ज्यामुळं या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं 141 धावांनी विजय मिळवला. सामन्यादरम्यान न्यूझीलंड संघाची खेळाडू मॅडी ग्रीननं ऑस्ट्रेलियन फलंदाज एलिस पेरीचा सुपरमॅन सारखा कॅच पकडत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत असताना 45व्या षटकात ली तैहूच्या शेवटच्या चेंडूवर पेरीने लाँगनं ऑनच्या दिशेने मोठा फटका मारला. स्थिरावलेली मॅडी ग्रीन तिच्या उजवीकडे धावली आणि मग हवेत शानदार उडी मारत झेल घेतला. हा अप्रतिम झेल पाहिल्यानंतर समालोचकांसह प्रेक्षकही आश्चर्यचकीत झाले.
व्हिडिओ-
वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे सुरू असलेल्या महिला विश्वचषकाच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा 141 धावांनी पराभव केला. 270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 129 धावांत आटोपला. या सामन्यात डार्सी ब्राउननं 22 धावांत तीन विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी, एलिस पेरी आणि ताहलिया मॅकग्रा यांनी अर्धशतकं झळकावलं. ज्यामुळं ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत 8 विकेट्स 269 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी लेह ताहुहूनं तीन विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-
- Rishabh Pant Record : कपिल देव यांचा 40 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला, पंतनं रचला इतिहास
- IND vs SL 2nd Test Live: भारताचं सामन्यावर वर्चस्व, लंचब्रेकपूर्वी 342 धावांची आघाडी
- Sachin on Sreesanth's Retirement: 'तू कायमच एक कतृत्त्ववान गोलंदाज होतास, दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा', सचिनची श्रीशांतसाठी खास पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha