एकाच एकदिवसीय सामन्यात शतकासह पाच विकेट्स, तीन अष्टपैलू खेळाडूंच्या नावावर खास विक्रमांची नोंद
एकाच दिवसीय क्रिकेट सामन्यात शतक मारून पाच विकेट्स घेणं काही सोपं नसतं. मात्र, क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं असं म्हटलं जातं.
एकाच दिवसीय क्रिकेट सामन्यात शतक मारून पाच विकेट्स घेणं काही सोपं नसतं. मात्र, क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं असं म्हटलं जातं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन अष्टपैलू खेळाडूंनी एकाच एकदिवसीय सामन्यात शतक मारून पाच विकेट्स घेतले आहे. वेस्ट इंडीज महान ऑलराऊंडर व्हिव्हियन रिचर्ड्स (Viv Richards) यांनी सर्वात प्रथम अशी कामगिरी करून दाखवली आहे. त्यानंतर या यादीत इंग्लंडचे पॉल कॉलिंगवूड (Paul Collingwood) आणि यूएईचे रोहन मुस्तफा (Rohan Mustafa) यांचा समावेश आहे.
व्हिव्हियन रिचर्ड्स
व्हिव्हियन रिचर्डसननं 1897 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतकासह पाच विकेट्स घेतले होते. हा सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं प्रथम फलंदाजी करत 50 धावांत तीन विकेट्स गमावले होते. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या व्हिव्हियन रिचर्डसननं संघाचा डाव सावरत 119 धावांची धमाकेदार खेळी केली. त्यांच्या व्यक्तिरिक्त वेस्ट इंडीजच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या संघानं न्यूझीलंडसमोर 237 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युरात न्यूझीलंडच्या संघ 142 धावांवर ढेपाळला. या सामन्यात व्हिव्हियन रिचर्डसन यांनी 10 षटकात 41 धावा देऊन 5 विकेट्स मिळवले.
पॉल कॉलिंगवूड
इंग्लंडच्या पॉल कॉलिंगवूड यांनी 2005 साली बांग्लादेशविरुद्ध शतक ठोकून पाच विकेट्स घेत या यादीत समावेश केला. या सामन्यात पॉल कॉलिंगवूडनं धमाकेदार खेळी केली होती. त्यानं 86 चेंडूत 112 धावांची खेळी केली होती. पॉल कॉलिंगवूडच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडनं बांग्लादेशसमोर 391 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशचा संघ 223 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात इंग्लंडकडून पॉल कॉलिंगवूडनं 10 षटकात 31 धावा देऊन 6 विकेट्स घेतले.
रोहन मुस्तफा
यूएईचा खेळाडू रोहन मुस्तफानं 4 एप्रिल 2017 रोजी पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ही विशेष कामगिरी केली. या सामन्यात 109 धावांची खेळी खेळण्यासोबतच त्याने 25 धावांत 5 विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-
- TATA IPL: आयपीएल 2022 साठी नवे नियम; DRS, Super Over आणि Playing 11 च्या नियमांत मोठा बदल
- Scott Hall dies at 63: डब्लूडब्लूई चाहत्यांसाठी वाईट बातमी, सुपरस्टार स्कॉट हॉल यांचं निधन
- Who Is Sandeep Nangal Ambian: भरमैदानात आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या, कोण होते संदीप नांगल अंबिया?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha