Virat Kohli T20I Captain: विराटच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर टीम इंडिया अजिंक्य, एकही टी -20 मालिका गमावली नाही
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत 45 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्याने 29 सामने भारताने जिंकले आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आगामी 2021 टी 20 विश्वचषकानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये याबाबत बरीच चर्चा होती.
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर कर्णधार विराट कोहली टी -20 कर्णधारपद सोडणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल त्याने चाहत्यांचे आभार मानले. भारतीय कर्णधार विराट कोहलीचा आतापर्यंतचा टी -20 प्रवास कसा राहिला ते जाणून घेऊया.
कोहलीने घरच्या मैदानावर कधीही टी -20 मालिका गमावली नाही
टी 20 सामन्यांच्या मालिकेबद्दल बोलायचे तर कर्णधार विराट कोहलीने भारतात झालेली एकही टी 20 मालिका गमावली नाही. त्याचा टी -20 रेकॉर्ड शानदार राहिला आहे.
विराटच्या नेतृत्वाखाली भारताच्या शेवटच्या 10 टी -20 मालिका
विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध 3-2, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1, न्यूझीलंडविरुद्ध 5-0, श्रीलंकेविरुद्ध 2-0, वेस्ट इंडिजविरुद्ध 2-1, इंग्लंडविरुद्ध 2-1 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 2-0 मालिका जिंकल्या. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-1, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-1 या टी -20 मालिका अनिर्णित राहिल्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्यचा टी -20 मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला.
याशिवाय विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत 45 टी - 20 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्याने 27 सामने भारताने जिंकले आहेत, तर 14 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर दोन सामने टाय तर दोन सामने अनिर्णित राहिले. जर टक्केवारीबाबत बोलायचे तर विराटच्या विजयाची टक्केवारी 65.11 टक्के आहे.
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहली कर्णधार असेल
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने हे स्पष्ट केले आहे की, तो वनडे आणि कसोटीत भारताच्या कर्णधारपदी तो कायम राहील. त्याने रोहितला टी -20 फॉरमॅटमध्ये कर्णधार करण्याचं सुचवलं आहे. त्याने रोहितच्या नेतृत्व गुणवत्तेचीही प्रशंसा केली.