Shahid Afridi on Virat's Captaincy: विराटनं भारताचं कर्णधारपदं सोडावं, शाहीद आफ्रिदीचं वक्तव्य
Shahid Afridi on Virat's Captaincy: भारताचा एकदिवसीय आणि कसोटीचा कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) टी -20 संघाचं कर्णधारपद सोडलंय.
Shahid Afridi on Virat's Captaincy: भारताचा एकदिवसीय आणि कसोटीचा कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) टी -20 संघाचं कर्णधारपद सोडलंय. विराटनं टी-20 विश्वचषकापूर्वीच टी-20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची सोशल मीडियावर पोस्ट केली होती. दरम्यान, टी-20 विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं निराशाजनक कामगिरी करून दाखवलीय. ज्यामुळं विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनं (Shahid Afridi) विराटला कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय. विराटनं भारताचं कर्णधारपद सोडलं पाहिजे, असं आफ्रीदीनं म्हटलंय. यामागचं कारणही अफ्रिदीनं सांगितलंय.
'समा टीव्ही चॅनल'वर बोलताना आफ्रिदी म्हणाला की, "विराट कोहली भारतीय क्रिकेटचा महत्वाचा भाग आहे. तो एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. परंतु, त्यानं कर्णधारपदं सोडून उर्वरित क्रिकेटचा आनंद घ्यावा. त्याला अजून बरंच क्रिकेट खेळायचं आहे. जर त्यानं उर्वरित फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं तर, तो फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करू शकेल", असंही आफ्रिदीनं म्हटलंय.
"रोहित शर्माला भारतीय टी-20 संघाचा कर्णधार बनवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. रोहित शर्मा अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. त्याची शॉट सिलेक्शन उत्कृष्ट आहे, मी त्याच्यासोबत मी वर्षभर क्रिकेट खेळलंय. रोहित शर्मा संघाला आवश्यक आहे, त्यावेळी आक्रमक खेळी करू शकतो. रोहित सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचं कर्णधारपद संभाळत आहे," असंही आफ्रिदी म्हटलंय.
विराटनं भारतीय टी-20 संघाचं आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळरूच्या कर्णधारपद सोडलंय. एवढंच नव्हे तर, कोहली एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही सोडू शकतो असं नुकतंच मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपलेल्या रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीत सूचित केलंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- विराट कोहली कसोटी-वनडे संघाचेही कर्णधारपद सोडू शकतो : रवी शास्त्री
- Hasan Ali Video : कॅच नव्हे, तू तर वर्ल्डकप सोडलास, नेटकऱ्यांनी हसन अलीला धू धू धुतला!
- सेमी फायनलपूर्वी 2 रात्री ICU मध्ये, मग सर्वात मोठ्या मॅचसाठी मैदानात, रिझवानच्या देशप्रेमावर क्रिकेटविश्व फिदा!