एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सेमी फायनलपूर्वी 2 रात्री ICU मध्ये, मग सर्वात मोठ्या मॅचसाठी मैदानात, रिझवानच्या देशप्रेमावर क्रिकेटविश्व फिदा!

T20 World Cup 2021: आजारी असतानाही देशासाठी मैदानात उतरणाऱ्या मोहम्मद रिझवानवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

T20 World Cup 2021: टी20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून (PAk vs AUS) पराभवाचा धक्का सहन करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) अर्धशतकी खेळी करत पाकिस्तान संघाला सन्माजनक धावसंख्या उभारली. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का सहन करावा लागला, मात्र पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रिझवान आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचं दिसत आहे. पाकिस्तान माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानं हा फोटो पोस्ट केला आहे. तसेच उपांत्य सामन्यापूर्वी रिझवान दोन दिवस आयसीयूमध्ये उपचार करत असल्याचा दावाही अख्तरनं केलाय. अख्तरच्या या दाव्याला पाकिस्तान संघाच्या टीम मॅनेजमेंटनं दुजोरा दिलाय.

आजारी असतानाही देशासाठी मैदानात उतरणाऱ्या मोहम्मद रिझवानवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. उपांत्य सामन्यापूर्वी आयसीयूमध्ये उपचार घेणारा रिझवान संघाला गरज असताना अगदी मोक्याच्या क्षणी देशासाठी मैदानात उतरला. तो फक्त मैदानात उतरलाच नाही तर धावांचा पाऊस पाडला. उपांत्य सामन्यात रिझवान यानं अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. या सामन्यात पाकिस्तानकडून रिझवान यानं सर्वाधिक धावा काढल्या.

उपांत्य सामन्यापूर्वी रिझवानच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होतं. रिझवान तापाने फणफणत असल्याचं समोर आलं होतं. सरावातही रिझवान यानं सहभाग घेतला नव्हता. 9 नोव्हेंबरपासून रिझवान रुग्णलयात उपचार घेत होता. पण देशाला गरज असल्यामुळे थोडं स्थिर वाटल्यानंतर मैदानावर उतरण्याचा निर्णय रिझवान यानं घेतला. ऑस्ट्रेलियाविरोधातील उपांत्य सामन्यात रिझवान यांनं 52 चेंडूत 67 धावांची खेळी केली. देशाप्रति असलेलं प्रेम रिझवानला मैदानात घेऊनं आल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून येत हेत.

भारताविरोधात हिरो ठरलेल्या शाहीन शाह आफ्रिदीच्या एकाच षटकांत मॅथ्यू वेडनं सामना फिरवला. मॅथ्यू वेडच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. मॅथ्यू वेड आणि स्टॉयनिसनं हारलेला सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं फिरवला.  पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात असमाधानकारक झाली. सुरुवातीलाच कर्णधार फिंच स्वस्तात माघारी परतला. एकतर्फी विजय मिळवण्याच्या दिशेनं पाकिस्तानने आगेकूच केली होती. मात्र, मॅथ्यू वेडनं 17 चेंडूत 41 आणि स्टॉयनिसनं 31 चेंडूत 40 धावांची खेळी करत सामना फिरवला. 

अखेरच्या पाच षटकांत ऑस्ट्रेलियानं सामना फिरवला –
13 व्या षटकांत ऑस्ट्रेलियानं पाच गड्यांच्या मोबदल्यात 96 धावा चोपल्या होत्या. अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अखेरच्या पाच षटकांत 62 धावांची गरज होती. अनुभवी मॅथ्यू वेड आणि स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. 16 व्या षटकांत 12 धावा, 17 व्या षटकांत 13 धावा चोपल्या. अखेरच्या 18 चेंडूत 37 धावा हव्या होत्या. त्यावेळी हसन अलीच्या एका षटकांत 15 धावा चोपत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं चोपला. त्यानंतर शाहीन आफ्रिदीच्या एका षटकांत लागोपाठ तीन षटकार लगावत मॅथ्यू वेडनं ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहचवलं.

न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना –
पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधीच इंग्लंडचा पराभव करत न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ येत्या 14 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी अंतिम सामना खेळणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया पुन्हा विश्वचषकावर नाव कोरणार का? की न्यूझीलंड पहिल्यांदाज टी-20 विश्वचषक उंचावणार?

फखर जमन – रिझवानची अर्धशतकी खेळी :
नाणेफेक गमवल्यानंतर पाकिस्तानकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुहम्मद रिझावा (52 धावा 67), बाबर आझम (34 बॉल 39 धावा), फखर जमान (32 बॉल 55 धावा, नाबाद), आसिफ अली (1 बॉल 0 धावा), शोएब मलिकनं 2 बॉलमध्ये 1 धाव केली. ज्यामुळं पाकिस्तानच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून मिचेल स्टार्कनं 2 विकेट्स मिळवल्या. तर, पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांना प्रत्येकी एक- एक विकेट्स मिळाली.

मॅथ्यू वेडची तुफानी खेळी –
मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून डेव्हिड वॉर्नर (30 बॉल 49 धावा), अॅरोन फिंच (1 बॉल 0 धावा), मिचेल मार्श (22 बॉल 28 धावा), स्टीव्हन स्मिथ (6 बॉल 5 धावा), ग्लेन मॅक्सवेल (10 बॉल 7 धावा), मार्कस स्टॉयनिस (31 बॉल 40), मॅथ्यू वेडनं 17 बॉलमध्ये धमाकेदार खेळी करीत 41 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं एक षटक राखून पाकिस्तानवर विजय मिळवलाय. पाकिस्तानकडून शादाब खाननं 4 विकेट्स घेतल्या. तर, शाहीन आफ्रिदीला एक विकेट्स मिळाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget