Virat Kohli : किंग कोहलाीने पत्नी अनुष्कासह मुलगी वामिकासोबतचा फोटो केला शेअर, सोबत लिहिलं इमोशनल कॅप्शन
Virat Kohli Pics : विराट कोहली उद्या अर्थात 10 जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार असून त्यापूर्वी ब्रेकमध्ये तो फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसून आला.

Virat Kohli Instagram Post : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ऑनफिल्ड खेळासह ऑफफिल्ड बऱ्याच गोष्टींमुळे अनेकदा चर्चेत असतो. जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. त्यामुळे त्याचे इन्स्टा फॉलोवर्सही मोठ्या प्रमाणात असून सर्वाधिक इन्स्टा फॉलोवर्स असणारा क्रिकेटर तो आहे. अशामध्ये त्याने केलेली कोणतीही पोस्ट व्हायरल होतच असते. आतातर त्याने फॅमिलीसोबत एक खास फोटो शेअर केला आहे. विराटने अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबतचा एक छान फोटो शेअर केला आहे. ज्याला सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे.
पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल भावूक
विराटने पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबतचा शेअर केलेला फोटो एका समुद्रकिनारचा आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये किंग कोहलीने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद दिल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत. पोस्टमध्ये त्याने आपल्या कारकिर्दीत जे काही मिळवले त्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले आहेत. पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासोबत बीचवर फिरताना त्याचा हा फोटो पाठीमागून टिपण्यात आला आहे.
पाहा विराटची पोस्ट
View this post on Instagram
टी20 संघाबाहेर होणार विराट?
विराट कोहली मंगळवारपासून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आपली ताकद दाखवणार आहे, तर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी तो टीम इंडियात नसणार अशाही बातम्या समोर येत आहेत. सध्याचे संघ व्यवस्थापन विराट कोहलीला T20 संघाच्या भविष्यातील कार्यक्रमासाठी योग्य मानत नसून विराट आता टी-20 मध्ये इतक्या वेगाने धावा करत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला त्याच्या धावांची सरासरी कमी राहते. अलीकडेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने संकेत दिले होते की भारतीय संघ टी-20 विश्वचषकाच्या पुनर्रचनेतून जात आहे. सध्या संघात अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. पण या तरुणांना संयमाची गरज आहे. विराटसह रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना यापुढे टी-20 संघात स्थान मिळणार नाही, हे त्याच्या या मुद्द्यावरून स्पष्ट झाले होते.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
