एक्स्प्लोर

Rohit Sharma PC : श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्माने दिली महत्त्वाच्या गोष्टींची उत्तर, पत्रकार परिषदेत हिटमॅन म्हणाला...

IND vs SL : एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती दिली आहे. यामध्ये बुमरहाच्या मालिकेबाहेर होण्यासह ईशान किशन संघात नसण्याबद्दलही माहिती त्याने दिली आहे.

Rohit Sharma Press conference : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 10 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसह जसप्रीत बुमराहच्या प्रकृतीसह अनेक गोष्टी सांगितल्या. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दल सांगितना, कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाईल आणि कोणत्या खेळाडूंना विश्रांती दिली जाईल, याबाबतही त्याने सांगितले, तर जाणून घेऊया रोहितच्या पत्रकार परिषदेतील खास गोष्टीबाबत

• रोहितने या पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराहबद्दल सांगितले की, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या नेटमध्ये गोलंदाजी करताना त्याला पाठीचा थोडा त्रास झाल्यामुळे त्याची विश्रांती वाढवली आहे. 
• याशिवाय, आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, त्याने अजून टी-20 क्रिकेट सोडलेले नाही.
• याशिवाय, श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्याबाबत बोलताना शर्मा म्हणाला की, दुर्दैवाने ईशान किशन पहिल्या सामन्यात नसणार असून शुभमन गिलला संधी दिली जाईल.

T20 कारकिर्दीबाबत मोठा खुलासा केला

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत रोहित शर्माचा समावेश न केल्यावर आता त्याला टी-20 संघात स्थान मिळणार नाही, अशा बातम्या पसरू लागल्या. आता रोहितसाठी टी-20 मध्ये पुनरागमन करणे खूप अवघड असेल आणि हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा नियमित कर्णधार बनवले जाईल. मात्र, युवा खेळाडूंना टी-20 मध्ये संधी द्यावी आणि या फॉरमॅटसाठी वेगळा संघ तयार करावा, असा विचार मंडळाकडून केला जात आहे. पण या सर्वादरम्यान मी अजून टी20 क्रिकेट सोडणार नसल्याचा निर्णय घेतल्याचं रोहितने सांगितलं.

शुभमन गिलला संधी मिळेल 

रोहित शर्मानेही ईशान किशन आणि शुभमन गिलबाबत स्पष्टीकरण यावेळी दिले. पत्रकार परिषदेत तो म्हणाला, “दुर्दैवाने आम्ही ईशानला खेळवू शकणार नाही. आम्हाला गिलला योग्य संधी द्यायला हवी." गिलने आतापर्यंत एकूण 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 57.25 च्या सरासरीने 687 धावा केल्या आहेत. तर ईशानने 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 53 च्या सरासरीने 477 धावा केल्या आहेत.

मधल्या फळीत सूर्या की अय्यर?

याशिवाय सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी कोणाला वनडे संघात संधी दिली जाईल? हा प्रश्न अजूनही कायम आहे. सध्या सूर्या उत्कृष्ट लयीत आहे. पण दुसरीकडे, श्रेयस अय्यर 2022 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळ करताना दिसला. 2022 मध्ये अय्यर हा सर्वोत्तम वनडे फलंदाज होता. त्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळेल हे पाहावे लागेल.

वेगवान गोलंदाजीचं काय?

बुमराह बाहेर झाल्यानंतर वनडे सामन्यात मोहम्मद शमीसोबत कोणत्या वेगवान गोलंदाजांचा समावेश केला जाईल? खांद्याच्या दुखापतीनंतर मोहम्मद शमीही पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याच्यासोबत कोण दिसणार? या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग हे ऑप्शन टीमकडे आहेत. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ram Naik : आपल्या सर्वांना आनंद देणारा निर्णय होईल, सगळे निवडून येणार, राम नाईक यांचा पियूष गोयल यांच्याबाबत मोठा दावा
आपल्या सर्वांना आनंद देणारा निर्णय होईल, मतदानानंतर भाजप नेते राम नाईक यांचं वक्तव्य
Bhiwandi Lok Sabha Voting: भिवंडीत तिहेरी लढत, कपिल पाटलांची हॅट्रीक की, मतदारराजा भाकरी फिरवणार?
भिवंडीत तिहेरी लढत, कपिल पाटलांची हॅट्रीक की, मतदारराजा भाकरी फिरवणार?
Lok Sabha Election 2024 : आज बॉलिवूडनगरीत मतदानाचा उत्साह! 'या' अभिनेत्री मात्र करत नाहीत मतदान; काय आहे कारण?
आज बॉलिवूडनगरीत मतदानाचा उत्साह! 'या' अभिनेत्री मात्र करत नाहीत मतदान; काय आहे कारण?
Maharashtra Lok Sabha Voting LIVE: मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांसह आज एकूण 13 जागांवर मतदान, नाशिक, दिंडोरी आणि धुळ्यातही मतदार बजावणार हक्क
Maharashtra Lok Sabha Voting LIVE: मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांसह आज एकूण 13 जागांवर मतदान, नाशिक, दिंडोरी आणि धुळ्यातही मतदार बजावणार हक्क
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bhandup Voting Queue : भांडूपमध्ये मतदानासाठी लांबच लांब रांगा, नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसादAkshay Kumar votes first time : भारतीय नागरिकत्व मिळल्यानंतर अक्षय कुमारने केलं पहिल्यांदा मतदानThane EVM Problem : ठाण्यातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबाVarsha Gaikwad Mumbai North Central : संविधान घेऊन वर्षा गायकवाड लोकसभेसाठी मतदानाला रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Naik : आपल्या सर्वांना आनंद देणारा निर्णय होईल, सगळे निवडून येणार, राम नाईक यांचा पियूष गोयल यांच्याबाबत मोठा दावा
आपल्या सर्वांना आनंद देणारा निर्णय होईल, मतदानानंतर भाजप नेते राम नाईक यांचं वक्तव्य
Bhiwandi Lok Sabha Voting: भिवंडीत तिहेरी लढत, कपिल पाटलांची हॅट्रीक की, मतदारराजा भाकरी फिरवणार?
भिवंडीत तिहेरी लढत, कपिल पाटलांची हॅट्रीक की, मतदारराजा भाकरी फिरवणार?
Lok Sabha Election 2024 : आज बॉलिवूडनगरीत मतदानाचा उत्साह! 'या' अभिनेत्री मात्र करत नाहीत मतदान; काय आहे कारण?
आज बॉलिवूडनगरीत मतदानाचा उत्साह! 'या' अभिनेत्री मात्र करत नाहीत मतदान; काय आहे कारण?
Maharashtra Lok Sabha Voting LIVE: मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांसह आज एकूण 13 जागांवर मतदान, नाशिक, दिंडोरी आणि धुळ्यातही मतदार बजावणार हक्क
Maharashtra Lok Sabha Voting LIVE: मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांसह आज एकूण 13 जागांवर मतदान, नाशिक, दिंडोरी आणि धुळ्यातही मतदार बजावणार हक्क
Sanjay Leela Bhansali :  अनेक कलाकारांबद्दल आदर, पण बॉलिवूडमध्ये रिलेशन बनवायला आलेलो नाही; संजय लीला भन्साळी नेमकं असं का म्हणाले?
अनेक कलाकारांबद्दल आदर, पण बॉलिवूडमध्ये रिलेशन बनवायला आलेलो नाही; संजय लीला भन्साळी नेमकं असं का म्हणाले?
Shah Rukh Khan : शाहरुख खान, अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी ते आयुष्मान खुराना; बोटाला शाई लागण्याआधी बॉलिवूडकरांचं चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन
शाहरुख खान, अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी ते आयुष्मान खुराना; बोटाला शाई लागण्याआधी बॉलिवूडकरांचं चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन
Mumbai Weather: प्रचंड उकाड्याने मुंबईतील नागरिक हैराण, पुढील 3 दिवस त्रास कायम; हवामान खात्याकडून मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट
प्रचंड उकाड्याने मुंबईतील नागरिक हैराण, पुढील 3 दिवस त्रास कायम; हवामान खात्याकडून मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट
Horoscope Today 20 May 2024 : आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Embed widget