एक्स्प्लोर

IND vs SA : पहिल्या कसोटी सामन्याआधी विराटसेनेचा कसून सराव, कर्णधार Virat Kohli ने शेअर केले फोटो

IND vs SA : भारतीय कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असून कसोटी सामन्यांना 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दौऱ्यामध्ये 3 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

IND vs SA Test Series 2021 : भारत (IND) आणि दक्षिण आफ्रीका (SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याची सुरुवात होणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ सेंचुरियन येथे पोहोचला आहे. पहिल्या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान भारतीय संघाने सरावालाही सुरुवात केली असून शनिवारी मैदानात उतरत भारतीय संघाने कसून सराव केला. यावेळी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मीडियाद्वारे संघातील काही खेळाडूंसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये विराट सोबत, उमेश यादव, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, आर. आश्विन आणि चेतेश्वर पुजारा हे दिसत आहेत. या फोटोला सोशल मीडिवार 29 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं असून अनेक कमेंट्सही करण्यात आल्या आहेत.

भारतीय संघाला या दौऱ्यात इतिहास रचन्याची संधी आहे. कारण या दौऱ्यातील कसोटी मालिका भारत जिंकल्यास दक्षिण आफ्रिकेच्या भूमित भारत 29 वर्षांनंतर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकणार आहे. त्यामुळे ही मानाची आणि मोठी कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. 

द. आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, प्रियांक पांचाल, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

स्टँड बाय प्लेअर - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जान नागव्सल्ला

असा असेल दौरा 

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये 3 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तर नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेमका दौरा कसा असेल यावर एक नजर फिरवूया...

कसोटी सामन्यांचे वेळापत्रक 

  • पहिला कसोटी सामना -  26 डिसेंबर, 2021 ते 30 डिसेंबर, 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन.
  • दुसरा कसोटी सामना -  3 जानेवारी,2022 ते 7 जानेवीर, 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.
  • तिसरा कसोटी सामना -  11 जानेवारी, 2022 ते 15 जानेवारी, 2022 न्यू लँड्स, केपटाऊन  

एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक 

  • पहिला एकदिवसीय सामना - 19 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल
  • दुसरा एकदिवसीय सामना - 21 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल
  • तिसरा एकदिवसीय सामना - 23 जानेवारी, 2022, न्यू लँड्स, केपटाऊन  

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijay : शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
मोठी बातमी, सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना
सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना
SRH vs PBKS : कूपर कॉनोलीचं शतक वाया, श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सलग तिसऱ्या पराभव, सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत टॉपवर   
श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जच्या पराभवाची हॅटट्रिक, गुणतालिकेतील पहिलं स्थान गमावलं, सनरायजर्स हैदराबाद टॉपवर
Election Result : बंगाल-आसाममध्ये भाजपचा नवा ट्रेंड, अनुसूचित जाती जमातींच्या जागांवर दमदार कामगिरी
बंगाल-आसाममध्ये भाजपचा नवा ट्रेंड, अनुसूचित जाती जमातींच्या जागांवर दमदार कामगिरी

व्हिडीओ

Punjab Blast : पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रीय? Special Report
Bengal Violance : बंगाल, बदला आणि बुलडोझर Special Report
Nasrapur Case : पोलीस इन अॅक्शन, नसरापुरात मध्यरात्री रिक्रिएशन Special Report
Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी
Congress Leaders Meet TVK Vijay Thalapathy : तामिळनाडू काँग्रेस नेत्यांनी घेतली 'विजय' यांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thalapathy Vijay : शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
शपथविधीपूर्वीच थलापती विजय अडचणीत; 2015 मधील घटनेवर गुन्हा दाखल करण्याची हायकोर्टात मागणी
मोठी बातमी, सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना
सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना
SRH vs PBKS : कूपर कॉनोलीचं शतक वाया, श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सलग तिसऱ्या पराभव, सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत टॉपवर   
श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जच्या पराभवाची हॅटट्रिक, गुणतालिकेतील पहिलं स्थान गमावलं, सनरायजर्स हैदराबाद टॉपवर
Election Result : बंगाल-आसाममध्ये भाजपचा नवा ट्रेंड, अनुसूचित जाती जमातींच्या जागांवर दमदार कामगिरी
बंगाल-आसाममध्ये भाजपचा नवा ट्रेंड, अनुसूचित जाती जमातींच्या जागांवर दमदार कामगिरी
राष्ट्रहिताचं काम डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल; गोव्यातील अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे प्रतिपादन
राष्ट्रहिताचं काम डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल; गोव्यातील अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे प्रतिपादन
Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं मोडला आयपीएलमधील रोहित शर्माचा विक्रम, महेंद्रसिंह धोनीची बरोबरी करण्याचा मान मिळवला
अभिषेक शर्मानं मोडला आयपीएलमधील रोहित शर्माचा विक्रम, महेंद्रसिंह धोनीची बरोबरी करण्याचा मान मिळवला
शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून 13 शाळांची यादी जाहीर, पालकांना सूचना, प्रवेश घेऊ नका
शैक्षणिक पंढरीत बोगस शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून 13 शाळांची यादी जाहीर, पालकांना सूचना, प्रवेश घेऊ नका
West Bengal : पश्चिम बंगालमध्ये हिंसा उफळली, चार जणांचा मृत्यू; गेल्या 15 वर्षांचा रक्तरंजित इतिहास, किती जणांची हत्या?
पश्चिम बंगालमध्ये हिंसा उफळली, चार जणांचा मृत्यू; गेल्या 15 वर्षांचा रक्तरंजित इतिहास, किती जणांची हत्या?
Embed widget