एक्स्प्लोर

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत अनोखा विक्रम, 132 वर्षांपूर्वी दोन सामन्यात होते 4 कर्णधार

IND vs NZ 2nd Test Match :  पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीनं पुन्हा एकदा कर्णधारपदाची सुत्रे हातात घेतली आहेत.

IND vs NZ, 2nd Test Match: भारत आणि न्यूजीलंड यांच्यादरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडिएमवर (Wankhede Stadium) दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहलीनं पुनरागमन केलं आहे. पण न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे टॉम लेथम न्यूझीलंड संघाचं नेतृत्व करत आहे. योगायोगानं दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत चार कर्णधार पाहायला मिळाले. यापूर्वी  132 वर्षांपूर्वी दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत चार कर्णधार झाले होते.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल झाले. अंजिक्य रहाणे, ईशांत शर्मा आणि रविंद्र जाडेजा यांना दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आलं. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही दुखापतीमुळे बाहेर बसला. भारतीय कर्णधार विराट कोहलीनं दुसऱ्य़ा कसोटी सामन्यात पुनरागमन केलं आहे. तर दुसरीकडे विल्यमसनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडची धुरा टॉम लेथमकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे 132 वर्षांपूर्वी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

1889 मध्येही दोन कसोटी मालिकेत चार कर्णधार -
1889 मध्ये पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये दोन सामन्यात चार कर्णधार झाले होते. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत चार कर्णधार झाले होते.  दक्षिण अफ्रीकाकडून ओवेन डुनेल आणि विलियम मिल्टन कर्णधार झाले होते. तर इंग्लंडकडून ऑब्रे स्मिथ आणि माँटी वोडेनहुई यांनी कर्णधारपद सांभाळलं होतं. दोन सामन्यात चार कर्णधार होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आता 2021 मध्ये अशी घटना घडली आहे.

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत अनोखा विक्रम, 132 वर्षांपूर्वी दोन सामन्यात होते 4 कर्णधार

मयांकची शतकी खेळी - 
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. दिवसाची सुरुवात भारतीय संघाने चांगली केली. सलामीवीरांनी तब्बल 80 धावांची भागिदारी केली. पण सलामीवीर शुभमन गिल 44 धावा करुन बाद होताच एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतू लागले. केवळ मयांकने (Mayank Agarwal) टिकून राहत शतक झळकावल्यामुळे भारताने किमान 200 धावांचा आकडा पार केला आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेलने (Ajaz Patel) चमकदार कामगिरी करत 4 विकेट खिशात घातल्या आहेत. सामन्याची सुरुवात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडत केली. ज्यानंतर सलामीवीर मयांक अगरवाल आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण संघ 80 धावांवर पोहोचताच शुभमन 44 धावा करुन बाद झाला. अजाज पटेलच्या चेंडूवर रॉस टेलरने त्याची झेल घेतली. त्यानंतर काही चेंडूनंतरच पुजारालाही अजाजने त्रिफळाचीत केलं. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराटलाही अजाजने पायचीत करत 80 धावांवरच भारताचे तीन महत्त्वाचे गडी तंबूत धाडले. त्यानंतर काही काळ श्रेयस अय्यर आणि मयांकने संघाचा डाव सांभाळला. पण 18 धावा करुन श्रेयस अजाजच्या चेंडूवर टॉम ब्लंडलच्या हाती झेलबाद झाला. ज्यामुळे भारताचे महत्त्वाते 4 ही फलंदाज तंबूत परतले. पण मयांकने मात्र टिकून राहत फलंदाजी केली. रिद्धिमान साहाने त्याला साथ देत दिवस संपेपर्यंत खिंड लढवली. ज्यामुळे दिवस अखेर भारताने 4 विकेट्सच्या बदल्यात 221 धावा केल्या आहेत. मयांक 120 आणि साहा 25 धावांवर खेळत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget