एक्स्प्लोर

Virat Kohli Retirement: कर्णधारपदही मिळणार होतं, पण माशी कुठे शिंकली? विराटच्या निवृत्तीची टाईमलाईन काय सांगते?

Virat Kohli news: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली होती. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्याने चर्चा रंगली होती.

Virat Kohli Retirement: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विराटचं (Virat Kohli) वय आणि फिटनेस बघता तो आणखी काही वर्ष क्रिकेट खेळू शकत होता, पण त्याने आताच निवृत्ती का घेतली, इंग्लंड दौरा (India Vs England Test Series) तोंडावर असताना, तो मैदानात उतरेल अशी अपेक्षा होती. पण आधी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि आता विराट कोहलीनेही निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

भारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामने खेळले गेले. मात्र, भारताला या मालिकेत 1-3 ने पराभवाचा सामना करावा लागला.

या मालिकेदरम्यान रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, आणि त्यानंतर 7 मे रोजी रोहित शर्मा आणि 12 मे रोजी विराट कोहली यांनीही निवृत्ती घेतली. न्यूझीलंडविरुद्ध 0-3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेतील पराभव, विराट आणि रोहित या दोघांचाही फारसा प्रभावी खेळ दिसून आला नाही. तिथूनच रोहित आणि विराटची निवृत्तीच्या घोषणेकडे वाटचाल सुरु झाल्याची चर्चा आहे. 

Team India: विराटची निवृत्ती भारतीय संघासाठी मोठा धक्का

विराट कोहलीची निवृत्ती भारतीय क्रिकेटसाठी मोठा धक्का मानला जातोय. अनेकांना वाटत होतं की कोहली अजून काही वर्षे खेळू शकतो. पण त्याने अचानक निर्णय घेऊन चाहत्यांना धक्का दिला. निवड समितीने भविष्यात त्यांना संघाबाहेर ठेवण्याचा अधिकार राखून ठेवला असला, तरी कोहलीचा सुमार फॉर्म हे एक कारण ठरू शकते. विराटने गेल्या 5 वर्षांत  केवळ एक शतक झळकावले होते, आणि त्याची सरासरी 54 वरून 46 वर आली होती.

Virat Kohli: कोहलीने स्वतःहून हा निर्णय घेतला, BCCI चा हा निर्णय नव्हता 

गेल्या काही महिन्यांत निवड समितीकडून मिळणाऱ्या सूचनांमुळेच विराटने आपल्या 14 वर्षांच्या करिअरला पूर्णविराम दिला. पण खरं काय झालं? एक व्यक्ती जो काही महिने आधी इंग्लंड दौऱ्याच्या तयारीत होता, त्याने अचानक टेस्ट क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय का घेतला? हे समजून घेण्यासाठी आपण मागच्या काही घडामोडी पाहणं आवश्यक आहे. 

डिसेंबर 2024  

8 डिसेंबर 2024  रोजी भारताने अ‍ॅडिलेड कसोटी तब्बल 10 विकेट्सने गमावली. यानंतर विराटला पुन्हा कर्णधार करण्याबाबत चर्चा सुरू झाली. मात्र, 30 डिसेंबरला मेलबर्न कसोटीतही भारताचा पराभव झाला आणि ट्रॉफी गमावली. मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर होता आणि फक्त एक सामना उरलेला होता. विराटच्या फॉर्मवरही प्रश्न उपस्थित झाले.

जानेवारी 2025 

जानेवारीमध्ये विराटने रणजी ट्रॉफीत दिल्लीसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. विराटने दिल्लीच्या प्रशिक्षकाला सांगितले की, तो इंग्लंड दौऱ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याला पुन्हा कर्णधार व्हायचं होतं. त्याने शेवटच्या सिडनी कसोटीत जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत अंतरिम कर्णधारपदही भूषवलं होतं.

एप्रिल 2025  

IPL दरम्यान निवड समितीसोबतच्या अनौपचारिक चर्चेत विराटला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या. संघ आता तरुण कर्णधारासह पुढे जायला इच्छुक आहे आणि विराटची निवड आता इतर खेळाडूंप्रमाणेच कामगिरीवर आधारित असेल. यानंतरच विराटने इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतल्याची चर्चा आहे.

मे 2025  

BCCI आणि  जवळच्या खेळाडूंनी विराटला समजावण्याचा प्रयत्न केला, पण विराट आपल्या निर्णयावर ठाम होता. 12 मे 2025 रोजी विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

कोहलीने 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडेमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी टी20 पदार्पण केलं. त्यांचा क्रिकेट कारकीर्द 14 वर्षांहून अधिक काळ चाललेली असून त्यांनी भारतीय संघासाठी मोठं योगदान दिलं.

आणखी वाचा

बीसीसीआयने विराटच्या थाटाला साजेसा निरोप दिला नाही, आता आरसीबीचे फॅन्स पांढरा सलाम देणार, खास प्लॅन तयार!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 3rd ODI Playing 11 : रोहित-गिल ओपनिंगला, इशान-सिराज बेंचवर; न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य Playing XI
रोहित-गिल ओपनिंगला, इशान-सिराज बेंचवर; न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य Playing XI
IND VS NZ 3rd ODI Weather Report : मैदानावर पाणीच पाणी, हॅमिल्टनमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस! भारत-न्यूझीलंड तिसरा वनडे होणार रद्द?, धडकी भरवणारा हवामान अंदाज
मैदानावर पाणीच पाणी, हॅमिल्टनमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस! भारत-न्यूझीलंड तिसरा वनडे होणार रद्द?, धडकी भरवणारा हवामान अंदाज
IND vs NZ 3rd ODI : आधी दोन पराभव, आता दोन बॉलर्स OUT! भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेआधी न्यूझीलंडची गोलंदाजी खिळखिळी, आता कोण झालं बाहेर?
आधी दोन पराभव, आता दोन बॉलर्स OUT! भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेआधी न्यूझीलंडची गोलंदाजी खिळखिळी, आता कोण झालं बाहेर?
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : टीम इंडियाचा कर्णधार पाकिस्तानच्या खेळाडूच्या सुटलेल्या बूटाची लेस बांधण्यासाठी खाली बसला तेव्हा...; पुढे मैदानात काय घडलं?
टीम इंडियाचा कर्णधार पाकिस्तानच्या खेळाडूच्या सुटलेल्या बूटाची लेस बांधण्यासाठी खाली बसला तेव्हा...; पुढे मैदानात काय घडलं?

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget