Delhi Squad Vijay Hazare Trophy : दिल्ली संघाची घोषणा! विराट कोहलीची निवड, पण खेळणार फक्त इतके सामने; ऋषभ पंतकडे संघाची धुरा, पाहा Squad
Virat Kohli to play for Delhi in Vijay Hazare Trophy Marathi News : दिल्लीच्या संघात विराट कोहली खेळणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं.

Vijay Hazare Trophy Delhi Squad News : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 हंगामाची सुरुवात 24 डिसेंबरपासून होत असून, दिल्लीच्या संघात विराट कोहली (Virat Kohli) खेळणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेने (DDCA) यावर स्पष्टता दिली आहे. डीडीसीएने जाहीर केलं आहे की विराट कोहली हंगामातील सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. स्वतः कोहलीनेच आपल्या उपलब्धतेची अधिकृत माहिती संघटनेला दिली आहे.
कोहलीसोबत पंत आणि इशांतही दिल्लीच्या स्क्वाडमध्ये
विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीची स्क्वाड जाहीर करताना डीडीसीएने विराट कोहलीची उपस्थिती कन्फर्म केली असून, ऋषभ पंत आणि इशांत शर्मा हेही संघाचा भाग असतील, असं स्पष्ट केलं आहे. या स्पर्धेसाठी ऋषभ पंतकडे दिल्लीच्या संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर आयुष बडोनीची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नितीश राणा स्क्वाडमध्ये असून, वेगवान गोलंदाज हर्षित राणा उपलब्ध असल्यास दिल्लीकडून खेळताना दिसतील. डीडीसीएने सध्या फक्त पहिल्या दोन सामन्यांसाठीच स्क्वाड जाहीर केली आहे.
दिल्लीचा पहिला सामना आंध्र प्रदेशविरुद्ध
आगामी विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीचा पहिला सामना 24 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 26 डिसेंबरला गुजरातविरुद्ध दुसरा सामना खेळला जाईल. या दोन्ही सामन्यांत विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील, कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याच्या बॅटमधून जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली होती.
Cricketers Rishabh Pant, Virat Kohli, Ishant Sharma, and Navdeep Saini have confirmed their availability and will be part of the Delhi Senior Men's Team for the Vijay Hazare Trophy for the 2025-26 domestic season. Rishabh Pant is appointed as the captain of the team. Harshit Rana… pic.twitter.com/uO75BB70x2
— ANI (@ANI) December 19, 2025
विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी दिल्लीचा संघ (Vijay Hazare Trophy Delhi Squad) -
ऋषभ पंत (कर्णधार), आयुष बडोनी (उपकर्णधार), विराट कोहली, अर्पित राणा, यश धुल्ल, सार्थक रंजन, प्रियांश आर्य, तेजस्वी सिंग (यष्टीरक्षक), नितीश राणा, हृतिक शोकीन, हर्ष त्यागी, सिमरजीत सिंग, प्रिन्स यादव, दिविज मेहरा, आयुष डोसेजा, वैभव कंदपाल, रोहन राणा, इशांत शर्मा, नवदीप सैनी. अनुज रावत (स्टँडबाय यष्टिरक्षक).
हे ही वाचा -





















