एक्स्प्लोर

India beats Sri Lanka : ना वैभव चमकला, ना आयुषची बॅट गरजली… तरीही भारताने श्रीलंकेला लोळवलं! थेट आशिया कपच्या अंतिम फेरीत मारली धडक

U-19 Asia Cup 2025 Marathi News : भारतीय अंडर-19 संघाने अंडर-19 आशिया कप 2025 मध्ये दमदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत धडक मारली.

U-19 Asia Cup 2025 India beats Sri Lanka by 8 wickets : भारतीय अंडर-19 संघाने अंडर-19 आशिया कप 2025 मध्ये दमदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत धडक मारली. दुबईतील आयसीसी अकॅडमी मैदानावर झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि अखेरीस तो 20-20 षटकांचा ठेवण्यात आला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेने 8 विकेट्स गमावून 138 धावा केल्या.

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा

भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. सलामीवीर दुल्निथ सिगेरा केवळ 1 धाव काढून बाद झाला, तर विरान चमुडिता 19 धावा करून तंबूत परतला. कविजा गमागे रनआऊट झाला. अवघ्या 28 धावांत 3 विकेट्स पडल्याने श्रीलंकेवर दबाव वाढला.

कर्णधार विमत दिनसागे (34) आणि चामिका हीनातिगाला यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र 84 धावांत 6 विकेट्स पडल्या. सातव्या विकेटसाठी हीनातिगाला–सेनेविरत्ने जोडीने 52 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हीनातिगाला सर्वाधिक 42 धावा करणारा ठरला. भारताकडून हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

ना वैभव चमकला, ना आयुषची बॅट गरजली…, तरी शेवट जबरदस्त!

139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार आयुष म्हात्रे (7) आणि वैभव सूर्यवंशी (9) लवकर बाद झाले. मात्र त्यानंतर विहान मल्होत्रा आणि आरोन जॉर्ज यांनी जबाबदारी घेत सामन्याचं चित्रच बदललं. विहानने 35 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत 45 चेंडूंमध्ये नाबाद 61 धावा केल्या. तर जॉर्जने 44 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत 49 चेंडूंमध्ये नाबाद 58 धावा केल्या. 18व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारत जॉर्जने भारताचा विजय निश्चित केला. विशेष उल्लेख अलीकडेच आयपीएल मिनी लिलावात आरसीबीकडून खरेदी करण्यात आलेल्या विहान मल्होत्राने आपल्या तडाखेबाज फलंदाजीने साऱ्यांचं लक्ष वेधलं.

अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान सामना (U-19 Asia Cup 2025 India vs Pakistan Final)

दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान असा थरारक अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. 

हे ही वाचा - 

Yuvraj Singh-Robin Uthappa : क्रिकेटविश्वात खळबळ! ED ने जप्त केली युवराज अन् उथप्पाची कोट्यवधींची मालमत्ता, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
Embed widget