एक्स्प्लोर

ICC POTM : 'किंग कोहली' यंदाचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ! वर्ल्ड कपमधील धडाकेबाज कामगिरीची पोचपावती

ICC Player of the month : आयसीसी कडून दर महिन्याला प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार देण्यात येतो, महिनाभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित केलं जातं.

Virat Kohli ICC Mens Player Of The Month : भारतीय क्रिकेटचाच नाही तर जागतिक क्रिकेटमधील स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला नुकत्याच मानाच्या 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' (ICC Player of the month) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) विराट अप्रतिम खेळी करत असल्याने त्याला याच खेळीची जणू पोचपावती मिळाली आहे. विराटसोबत वर्ल्डपमध्ये चांगली कामिगिरी करणारे आणखी दोन खेळाडूही नॉमिनेट झाले होते यामध्ये झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांचा समावेश होता. पण विराटची खेळीही विराट असून प्रेक्षकांनीही त्यालाच पसंती दिल्याने विराटनं पुरस्कारावर नाव कोरलं आहे. तर महिलांमध्ये पाकिस्तानची निदा दार विजयी झाली आहे.

मागील बरीच वर्षे भारताकडून क्रिकेट खेळणाऱ्या विराटने काही महिन्यांपूर्वी कर्णधारपद सोडलं. 2019 च्या अखेरीसपासून खराब फॉर्मात विराट होता. 70 शतकं ठोकणाऱ्या विराटला 71 वं शतक काय करता येत नव्हता. पण बरीच मेहनत आणि सराव करुन अखेर 2022 च्या आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध विराटनं शतक ठोकलं आणि पुन्हा एकदा तो फॉर्मात परतला. त्याने पुन्हा एकदा आपला कमाल खेळ जगाला दाखवण्यास सुरुवात केली असून ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) विराट टीम इंडियासाठी अतिशय महत्त्वाची कामगिरी करत आहे. भारताचे पाच सामने विश्वचषकातील खेळले असून यातील तीन सामन्यात विराटनं अर्धशतक झळकावत तो नाबाद राहिला आहे. त्यामुळे विराट भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलत असल्याचं दिसत आहे. 

कोहलीची टी20 वर्ल्ड कप 2022 मधील कामगिरी

विश्वचषकाची सुरुवात झाल्यापासून विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. सर्वात पहिला भारताचा सामना पाकिस्तानसोबत झाला. ज्यात एकीकडे भारतीय फलंदाजी ढासळत असताना विराटनं एकहाती झुंज दिली. त्याने सामना जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेदरलँडविरुद्ध 44 चेंडूत नाबाद 62 धावा विराटनं केल्या. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट 12 धावाच करु शकला. पण मग बांगलादेशविरुद्ध विराट 44 चेंडूत 62 धावा करुन पुन्हा फॉर्मात परतला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विराटने 26 धावा केल्या असून अशारितीने एकूण 5 सामन्यात त्यानं 246 धावा केल्या आहेत.  

आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड

आयसीसीनं (ICC) क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये वरील खेळाडूंना तर महिला क्रिकेटमध्ये भारताची जेमिमा रॉड्रीग्ज, दिप्ती शर्मा आणि पाकिस्तानच्या निदा दार यांना नामांकित करण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget