विराट कोहली ते M S धोनी, महिला असत्या तर कशा दिसल्या असत्या? AI चे कमाल फोटो
Viral Cricketer Images : विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू चाहत्यांचे मन जिंकत आहेत.
Viral Cricketer Images : विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू चाहत्यांचे मन जिंकत आहेत. दमदार कामगिरी करत हे खेळाडू विजयात मोलाचा वाटा उचलतात... विराट कोहलीसह हार्दिक पांड्या अन् इतर खेळाडू स्टायलिश लूकमुळेही चर्चेत असतात.. क्रिकेटपटूची स्टाईल आणि लूक एखाद्या अभिनेत्याप्रमाणे असते.. धोनी आणि विराट कोहलीच्या लूकची तर सोशल मीडियावर चर्चाच असते.. पण हेच खेळाडू महिला असत्या तर कशा दिसल्या असत्या... याचा कधी विचार केला आहे का ? AI ने या स्टार खेळाडूंच्या फोटोवर प्रयोग केलाय. हे खेळाडू महिलांच्या आवतारात कसे दिसू शकतात.. त्याचे फोटो एआयने तयार केले आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळं (Artifical Intelligence) तंत्रज्ञान (Technology) युगात मोठे बदल घडत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) याच्यामुळे अनेकांच्या कलागुणांना वाव मिळाला.. अनेकजण याचा वापर करत नवनवे प्रयोग करत आहेत. एआयच्या मदतीनं आपण आज अशा अशा गोष्टी करू शकतो ज्यांची यापूर्वी कल्पना सुद्धा केली नव्हती.. आता एआयने भारतीय खेळाडू महिलाच्या अवतारात कसे दिसतील... याचे काही फोटो समोर आले आहेत. जर प्रसिद्ध पुरुष क्रिकेटपटू महिला असते तर ते कसे दिसले असते? या कल्पनेतून एआयने या फोटोंची निर्मिती केली आहे. यामध्ये रोहित शर्मा, विरोट कोहली, एम.एस धोनी, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, शिखर धवन, शुभमन गिल यासारखे अनेक लोकप्रिय क्रिकेटपटू आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
एआय म्हणजे काय ? एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जातो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मशीन, कॉम्प्युटर आणि यंत्र बनवून भविष्यात महत्वाची कामे करण्यासाठी मानवाच्या बदली वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच कोणतेही कठीण काम एका बुद्धिमान मशीनमार्फत केले जाऊ शकते. तसेच मशीनचा वापर 24 तास केला जाऊ शकतो. त्यामुळे जास्त उपयोग करता येऊ शकतो.
धोनी म्हातारपणी कसा दिसेल, उतारवयातील रोहित ओळखता येईल? AI ने बनवलेले फोटो बघाच!
IPL 2023 : चढाओढ फक्त तुमच्या डोक्यात, खरी स्पर्धा... नवीन उल हकनंतर विराट कोहलीची पोस्ट चर्चेत
Video: 23 वर्षीय नवीन उल हक, केवळ विराटच नव्हे तर आफ्रिदी, परेरा आणि डॉर्सीलाही भिडला!
पुन्हा भिडले... ! गौतम गंभीर-नवीन अन् लखनौने विराट कोहलीला डिवचले, किंगचे चाहते भडकले