Himanshu Sangwan OUT Virat Kohli : 6 धावांवर बाद होताच किंग कोहलीचे चाहते चवताळले, विकेट घेतली 'हिमांशू'ने अन् टार्गेट केलं भलत्यालाच; इन्स्टावर जाऊन चक्क...
कसोटी क्रिकेटमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे.

Himanshu Sangwan OUT Virat Kohli Ranji Trophy : कसोटी क्रिकेटमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. दिल्लीकडून खेळताना त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले, पण त्याच्या कामगिरीत काही बदल झाला नाही. कोहली इथेही अपयशी ठरला. त्याची शिकार रेल्वेचा वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानने केली. पण विराटला बाद केल्यानंतर चाहते सोशल मीडियावर हिमांशूला खूप शिवीगाळ करत आहेत. पण, कथेत एक ट्विस्ट आहे. खरं तर, क्रिकेटपटू हिमांशू सांगवानऐवजी, त्याच नावाच्या दुसऱ्या चाहत्याला टार्गेट केले जात आहे.
Virat Kohli's fans are abusing someone else, Himanshu Sangwan. Virat himself doesn't know how to perform and people abuse the bowlers. Poor bowler and this guy. pic.twitter.com/Q5AlxwaMKA
— Aufridi Chumtya (@ShuhidAufridi) January 31, 2025
क्रिकेटर हिमांशू सांगवान सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. कारण म्हणजे त्याने विराट कोहलीला आऊट केले, त्यानंतर आता चाहते त्याच्यावर संताप व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्याला शिवीगाळही केली. पण चाहत्यांच्या चुकीमुळे, हिमांशू सांगवान नावाच्या दुसऱ्या वापरकर्त्याला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
Koi aur Himanshu Sangwan gaali kha raha hai 😭😭 pic.twitter.com/xSh4qPTQRD
— Abhishek ✨ (@ImAbhishek7_) January 31, 2025
दरम्यान, एका युजरने इंस्टाग्राम पोस्टचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की, 'विराट कोहलीचे चाहते दुसऱ्या हिमांशू सांगवानला शिवीगाळ करत आहेत. विराटला स्वतःला कसे कामगिरी करावी हे माहित नाही आणि लोक गोलंदाजांना शिवीगाळ करतात. एका वापरकर्त्याने रडणाऱ्या इमोजीसह लिहिले, 'दुसऱ्या काही हिमांशू सांगवानशी गैरवर्तन केले जात आहे'. एका युजरने विराटच्या चाहत्यांची खिल्ली उडवत लिहिले की, 'हा तो हिमांशू सांगवान नाहीये'.
Kohli fans kisi aur himanshu sangwan ko gaali de rahe insta par😭 https://t.co/QbYKtfXoOE pic.twitter.com/PRz7rL757c
— Ritik (@ThenNowForeve) January 31, 2025
विराट कोहलीचे चाहते सोशल मीडियावर ज्या हिमांसू सांगवानला शिवीगाळ करत आहेत, त्यानेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'बंधूंनो, मी तो क्रिकेटपटू हिमांशू सांगवान नाही.'
12 वर्षांनंतर परतला पण...
12 वर्षांनंतर रणजीमध्ये विराट कोहलीचे पुनरागमन खूपच निराशाजनक होते. 15 चेंडूत 6 धावा काढल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. रेल्वेच्या हिमांशू सांगवानने तोच चेंडू विराट कोहलीला टाकला जो त्याची कमजोरी आहे, तो ऑफ स्टंप चेंडू. विराटने स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट स्टंपमध्ये घुसला आणि विकेट पडली. विराटची विकेट घेतल्यानंतर हिमांश सांगवान अगदी विराट कोहलीच्या शैलीत सेलिब्रेशन करताना दिसला आणि मैदानावर एकच शांतता पसरली.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
