Virat Kohli-Rohit Sharma : निवृत्तीतून कमबॅक? विराट-रोहितच्या रिटायरमेंटवर नवा ट्विस्ट; बीसीसीआयला धाडलं पत्र..., धक्कादायक सत्य आलं समोर
Virat Kohli and Rohit Sharma Fact Check Marathi News : विराट कोहलीने 12 मे 2025 रोजी, तर रोहित शर्माने 7 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

Virat Kohli and Rohit Sharma Fact Check News : भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने 12 मे 2025 रोजी, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 7 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. या दोन्ही स्टार खेळाडूंच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सध्या हे दोघेही आयपीएल 2026 मध्ये खेळताना दिसत आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कोहलीने 69* धावांची दमदार खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला, तर ‘हिटमॅन’ रोहित शर्माने केकेआरविरुद्ध 78 धावा करत मुंबई इंडियन्सला जिंकवले.
Rohit Sharma & Virat Kohli are back from RETIREMENT #Cricket pic.twitter.com/KINBqAOeN1
— IPL X News (@IPLXNews) April 1, 2026
दरम्यान, आयपीएलदरम्यानच कोहली आणि रोहितच्या कसोटी निवृत्तीवरून यू-टर्न घेण्याच्या चर्चांना जोर आला आहे. सोशल मीडियावर असे दावे व्हायरल होत आहेत की दोघांनीही कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Virat kohli takes his test retirement back. #virat #viratkohli #iplonstar #ipl #AprilFoolsDay pic.twitter.com/WySw2xg7pD
— news, feeds, and updates (@cric_updates18) April 1, 2026
कोहली-रोहित निवृत्तीवरून यू-टर्न घेणार?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की विराट कोहली आणि रोहित शर्मा याने कसोटी निवृत्ती मागे घेतली असून हा निर्णय बीसीसीआयच्या अधिकृत निवेदनातून जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय काही पोस्टमध्ये तर कोहलीने स्वतःच पुनरागमन जाहीर केल्याचेही म्हटले गेले. मात्र, हे सर्व दावे पूर्णपणे खोटे आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) किंवा या दोन्ही खेळाडूंनी अशा प्रकारचे कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
Well well well, as needed, Virat Kohli has taken back his retirement from test cricket. Much needed news for the Indian cricket fans.#cricket #bcci #india #ipl
— This account shares best tweets (@bestandlatest) April 1, 2026
वनडे फॉर्मेटमध्ये उपलब्ध
कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली आता फक्त वनडे फॉर्मेटमध्ये भारतीय संघासाठी उपलब्ध आहेत. दोघांनीही 18 जानेवारी 2026 रोजी इंदूर येथे न्यूझीलंडविरुद्ध आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता. आगामी काळातही हे दोघे दिग्गज वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत.
🚨 BIG BREAKING NEWS 🚨
— lndian Sports Netwrk (@IS_Netwrk29) April 1, 2026
- Breaking his retirement, Virat Kohli is set to return to Test cricket. He will play a match for India the next test series. pic.twitter.com/5hb02fFapK
VIRAT KOHLI TAKES BACK HIS TEST RETIREMENT 🚨 pic.twitter.com/5Odj8H15L0
— AB HII (@imAbhishek9596) April 1, 2026
हे ही वाचा -




















