पाकिस्तानी खेळाडूंचा पगार नाही, इतका टॅक्स भरतात कोहली-धोनी; अहवालातून भुवया उंचावणारी आकडेवारी
जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटर विराट कोहली किती कर भरतो हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल....
Tops Highest Tax-Paying Cricketers List : भारतीय स्टार क्रिकेटर आणि जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक विराट कोहली केवळ मैदानावरील त्याच्या कामगिरीमुळेच नव्हे तर मैदानाबाहेरील त्याच्या आर्थिक योगदानामुळे देखील चर्चेत असतो. कोहली हा केवळ भारताचाच नव्हे तर जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू मानला जातो. त्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे, ज्यामुळे तो ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत टॉपवर आहे.
जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 22.79 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच 1904 कोटी रुपये आहे. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटर विराट कोहली किती कर भरतो हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंना मिळून कोहली आणि धोनी मिळून आयकर भरतात तेवढा पगार नसेल.
एक अहवाल समोर आला आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की विराट कोहलीने गेल्या आर्थिक वर्षात 66 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे, तर माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने 38 कोटी रुपयांचा कर भरला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर आहे, ज्याने 28 कोटींचा कर भरला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही 23 कोटी रुपयांचा कर भरला असून तो यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
Highest tax paying cricketers in the previous financial year (Fortune India):
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 4, 2024
Virat Kohli - 66cr.
MS Dhoni - 38cr.
Sachin Tendulkar - 28cr.
Sourav Ganguly - 23cr.
Hardik Pandya - 13cr. pic.twitter.com/TIhcqRnCAx
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही या यादीत मागे नाही. गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी 13 कोटी रुपयांचा करही भरला आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनेही गेल्या आर्थिक वर्षात 10 कोटी रुपयांचा आयकर भरला असून तो सहाव्या स्थानावर आहे.
पाकिस्तानी खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी काही पाकिस्तानी खेळाडूंनी क्रिकेट बोर्डावर त्यांना मानधन न दिल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानची आर्थिक स्थिती कोणापासून लपलेली नाही. पाकिस्तानकडे जेवणासाठी पैसे नाहीत तर ते आपल्या खेळाडूंना पगार कसे देणार? यामुळेच पाकिस्तानी खेळाडू जगभरातील लीगमध्ये खेळून पैसे कमवतात.
हे ही वाचा -