एक्स्प्लोर

Duleep Trophy 2024 Date Live Streaming : ॲक्शनमध्ये दिसणार भारतीय स्टार्स! कधी, कुठे पाहता येणार दुलीप ट्रॉफीचे सामने? जाणून घ्या सर्व काही

Duleep Trophy 2024 Date Live Streaming : भारतीय क्रिकेटचा 2024-25 देशांतर्गत हंगाम गुरुवार 5 सप्टेंबर रोजी प्रतिष्ठित दुलीप ट्रॉफी सुरू होणार आहे.

Duleep Trophy 2024 Date Live Streaming : भारतीय क्रिकेटचा 2024-25 देशांतर्गत हंगाम गुरुवार 5 सप्टेंबर रोजी प्रतिष्ठित दुलीप ट्रॉफी सुरू होणार आहे. चार संघांच्या या स्पर्धेत एकूण सहा सामने होणार आहेत. यामध्ये प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) यंदा सर्व खेळाडूंना दुलीप ट्रॉफीमध्ये सहभागी होणे बंधनकारक केले आहे. आता ही स्पर्धा नव्या फॉरमॅटमध्ये होणार आहे. यापूर्वी दुलीप करंडक ही विभागीय स्पर्धा असायची. आता हा सामना भारत अ, भारत ब, भारत क आणि भारत ड यांच्यात होणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि अनुभवी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर केएल राहुल, इशान किशन, शुभमन गिल, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग आणि ऋषभ पंत यांसारखी अनेक मोठी नावे या हंगामात खेळताना दिसणार आहेत. आगामी आंतरराष्ट्रीय कसोटी हंगामासाठी सर्वोत्कृष्ट भारतीय संघ तयार करण्याच्या कल्पनेने ही स्पर्धा नवीन स्वरूपात सादर करण्यात आली आहे.

भारत अ संघाची कमान शुबमन गिलच्या हाती असेल. त्यात केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि ध्रुव जुरेल यांचाही समावेश आहे. भारत ब संघाचे नेतृत्व अनुभवी देशांतर्गत खेळाडू अभिमन्यू इसवरन करणार आहे. इंडिया क चे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे, तर यावर्षीचा आयपीएल विजेता कर्णधार श्रेयस अय्यर इंडिया ड चे नेतृत्व करेल. मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांना आजारपणामुळे सोडण्यात आले आहे. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाला बीसीसीआयने कोणतेही कारण न देता संघातून मुक्त केले.

दुलीप ट्रॉफी 2024 चे लाईव्ह स्ट्रीमिंग...

  • दुलीप ट्रॉफी 2024 कधी,कुठे खेळवले जातील?

दुलीप ट्रॉफीची 61वी आवृत्ती पाच सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सामने बेंगळुरू आणि अनंतपूर येथे खेळवले जातील.

  • दुलीप ट्रॉफी 2024 चे थेट प्रक्षेपण कोठे होईल?

दुलीप ट्रॉफी 2024 स्पोर्ट्स 18-3 आणि स्पोर्ट्स 18 खेल वर थेट प्रक्षेपित केली जाईल.

  • दुलीप ट्रॉफी 2024 ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?

दुलीप ट्रॉफी 2024 चे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर होईल.

संघ खालीलप्रमाणे

भारत अ : शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रायन पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएल राहुल, टिळक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा , कुमार कुशाग्र, शास्वत रावत.
भारत ब : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी (फिटनेसवर अवलंबून), वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर. साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन.
भारत क : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू मार्कन, मयांश अरमान, अरमान मार्के, संदीप वारियर.
भारत ड : श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिककल, इशान किशन (यष्टीरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भगत , सौरभ कुमार.

दुलीप ट्रॉफी 2024 चे वेळापत्रक

भारत अ विरुद्ध भारत ब : 5-8 सप्टेंबर
भारत क विरुद्ध भारत ड : 5-8 सप्टेंबर
भारत अ विरुद्ध भारत ड : 12-15 सप्टेंबर
भारत ब विरुद्ध भारत क : 12-15 सप्टेंबर
भारत ब विरुद्ध भारत ड : 19-22 सप्टेंबर
भारत अ विरुद्ध भारत क : 19-22 सप्टेंबर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
विनोद कांबळींना 'ब्रेन स्ट्रोक'चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, नेमकं काय घडलं?
Abhishek Bachchan Never Bought An IPL Team: कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?
कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?
MI vs PBKS IPL 2026: रोहित शर्मा OUT, दानिश मालेवार IN...; पंजाबविरुद्ध अशी असेल मुंबई इंडियन्सची Playing XI
रोहित शर्मा OUT, दानिश मालेवार IN...; पंजाबविरुद्ध अशी असेल मुंबई इंडियन्सची Playing XI
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajat Patidar: या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
Prajakta Mali On Devendra Fadnavis: अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!
अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
Gautam Gambhir: 'बीसीसीआयमध्ये 'शत्रूंनी' घेरला, निवड समिती सुद्धा विरोधात, त्यांना पदावरून काढून टाकल्यास..' टीम इंडियाच्या गुरुजींबदल इतकं बेधडक नेमकं कोण बोलला?
'बीसीसीआयमध्ये 'शत्रूंनी' घेरला, निवड समिती सुद्धा विरोधात, त्यांना पदावरून काढून टाकल्यास..' टीम इंडियाच्या गुरुजींबदल इतकं बेधडक नेमकं कोण बोलला?
महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ
महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ
Satara News: महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
Embed widget