Vijay Hazare Trophy 2022: पुन्हा महाराष्ट्राचं विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सौराष्ट्रानं दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली!
SAUR vs MAH, Vijay Hazare Trophy 2022: विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या फायनल सामन्यात महाराष्ट्राला सौराष्ट्राकडून (Saurashtra vs Maharashtra) पाच विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला.
SAUR vs MAH, Vijay Hazare Trophy 2022: विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या फायनल सामन्यात महाराष्ट्राला सौराष्ट्राकडून (Saurashtra vs Maharashtra) पाच विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह पुन्हा महाराष्ट्राचं विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात महाराष्ट्रानं पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक दिली होती. पण अंतिम सामन्यात त्यांच्या पदरात निराशा पडली. दुसरीकडं, सौराष्ट्र संघानं दुसऱ्यांना विजय हजारे ट्रॉफीवर नाव कोरलंय. याआधी 14 वर्षांपूर्वी सौराष्ट्र संघानं हा खिताब जिंकला होता.
महाराष्ट्राकडून मिळालेल्या 249 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सौराष्ट्राच्या संघाची सुरुवात चांगली झाली. सौराष्ट्राचे सलामीवीर हार्विक देसाई आणि शेल्डन जॅक्सन यांच्या पहिल्या विकेट्ससाठी 125 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर 27 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्विक देसाई बाद झाला. सौराष्ट्राच्या संघानं दुसरी विकेट लगेच गमावली. एका बाजूला सौराष्ट्राच्या विकेट पडत असताना शेल्डन जॅक्सननं संघाची दुसरी बाजू संभाळून ठेवली. त्याच्या नाबाद 133 धावांच्या खेळाच्या जोरावर सौराष्ट्रानं पाच विकेट्सनं हा सामना जिंकला.
सौराष्ट्राची भेदक गोलंदाजी
या सामन्यात सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनादकट नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या महाराष्ट्राच्या संघाची सुरुवात खराब झाली. महाराष्ट्राच्या डावातील पाचव्या षटकात सलामीवीर पवन शाह रन आऊट झाला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि सत्यजीत बच्छावनं संयमी खेळी दाखवत संघाचा डाव पुढं नेला. परंतु, 25व्या षटकात सत्यजीत बाद झाला. मात्र, ऋतुराज गायकवाडनं एकाकी झुंज सुरूच ठेवली. त्यानं 131 चेंडूत 108 धावांचं योगदान दिलं. दरम्यान, 42 व्या षटकातील अखेरच्या ऋतुराज गायकवाड बाद झाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. सौराष्ट्राकडून चिराग जानीनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, जयदेव उनादकट, प्रेरक मांकड आणि प्रार्थ भूत यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली.
ऋतुराजची शतकी खेळा व्यर्थ
या सामन्यात महाराष्ट्राचे कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणखी एक शतक ठोकून संघाला सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचवलं. विजय हजारे ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात ऋतुराज गायकवाडनं मागच्या पाच डावात चार शतकं झळकावली आहेत. आजच्या सामन्यात त्यानं संथ खेळी केली. पण त्यानंतर त्यानं आपला गियर बदलत आणि सौराष्ट्राच्या गोलंदाजांची शाळा घेतली. परंतु, सौराष्ट्राच्या विजयामुळं ऋतुराज गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ ठरली.
हे देखील वाचा-
Dwayne Bravo: ड्वेन ब्राव्हो आयपीएलमधून निवृत्त; सीएसकेच्या संघानं सोपवली मोठी जबाबदारी
https://marathi.abplive.com/sports/cricket/ipl-2023-dwayne-bravo-retires-from-ipl-appointed-as-chennai-super-kings-csk-bowling-coach-1126462