सारा तेंडुलकर मेडिसिनमध्ये बनली मास्टर, सचिन तेंडुलकरकडून खास शब्दात कौतुक
Sara Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर मेडिसिनमध्ये मास्टर बनली आहे.
Sara Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर मेडिसिनमध्ये मास्टर बनली आहे. 'क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्युट्रीशन'मध्ये मास्टर बनल्याची माहिती सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. युनिवर्सिटी कॉलेज लंडनमध्ये पदव्युत्तर परीक्षेत विशेष प्रावीण्यासह सारा तेंडुलकर उत्तीर्ण झाली आहे. पदवी प्रदान सोहळ्याचा व्हिडीओ सचिनकडून ट्वीट केलाय. तर 'ढेर 'सारा'प्यार' म्हणत सचिननं लेकीचं कौतुक केलंय.
सारा तेंडुलकर मेडिसिनमध्ये मास्टर बनली आहे. 'क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्युट्रीशन'मध्ये मास्टर बनली. सचिन तेंडुलकरनं ट्वीट करुन माहिती दिली. युनिवर्सिटी कॉलेज लंडनमधून सारा मास्टर..पदव्युत्तर परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण...'ढेर 'सारा'प्यार'अशी पोस्ट करत सचिन तेंडुलकरने आपल्या लेकीचं कौतुक केले आहे. पदवी प्रदान सोहळ्याचा व्हिडीओ सचिनकडून पोस्ट करण्यात आलाय. पालक या नात्याने, इथे येण्यासाठी वर्षानुवर्षे केलेले सर्व काम पाहिल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. ते सोपे नाही. भविष्यासाठी तुमच्या सर्व स्वप्नांसाठी येथे आहे, असे पोस्टमध्ये सचिनने म्हटलेय.
View this post on Instagram
आणखी वाचा :
IPL 2024 : प्लेऑफमध्ये आव्हान संपल्यानंतर विराट इमोशनल; म्हणाला, सन्मानासाठी खेळलो आणि...