एक्स्प्लोर

ENG vs IND 4th T20 : पहिल्या सामन्यात 14, दुसऱ्यात 13 धावा... वैभवचा निकाल नापास! पण तरी प्लेइंग-11 मधून नाही होणार बाहेर? टीम इंडियाच्या प्रयोगशाळेत बळी पडला संजू?

Vaibhav Sooryavanshi News : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांत त्याला आपली चमक दाखवता आलेली नाही.

Vaibhav Sooryavanshi ENG vs IND 4th T20 : भारतीय क्रिकेट संघात सध्या मोठ्या प्रमाणावर युवा खेळाडूंना वाव दिला जात आहे. यात अवघ्या 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी प्रयोगशाळेचा नवा चेहरा ठरला आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट गाजवल्यानंतर वैभवच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची क्रिकेट जगताला मोठी उत्सुकता होती. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांत त्याला आपली चमक दाखवता आलेली नाही. लागोपाठ दोन सामन्यांत फ्लॉप ठरल्यानंतरही संघ व्यवस्थापन त्याला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे वरिष्ठ खेळाडू संजू सॅमसनच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वैभवचा आंतरराष्ट्रीय निकाल 'नापास', पण मॅनेजमेंटचा विश्वास

मोठ्या अपेक्षेने मैदानात उतरलेल्या वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दडपण अद्याप हाताळता आलेले नाही. पहिल्या सामन्यात तो फक्त 14 धावा करू शकला, तर दुसऱ्या सामन्यातही त्याला अवघ्या 13 धावाच करता आल्या.  सलग दोन सामन्यांत स्वस्तात बाद झाल्यामुळे सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात त्याच्या खेळण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, तरीही त्याला तिसऱ्या सामन्याच्या प्लेइंग-11 मधून बाहेर काढले जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, भारतीय संघ व्यवस्थापन वैभवच्या क्षमतेवर पूर्णपणे फिदा आहे. टी-20 क्रिकेटचे भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

संजू सॅमसन पुन्हा एकदा बळी?

वैभव सूर्यवंशीला संघात जागा देण्यासाठी संघ व्यवस्थापनासमोर अभिषेक शर्मा, इशान किशन आणि संजू सॅमसन हे पर्याय होते. अखेर, व्यवस्थापनाने संजू सॅमसनला प्लेइंग-11 मधून बाहेरचा रस्ता दाखवला. संजू सॅमसनसारख्या विश्वविजेत्या आणि अनुभवी खेळाडूला बाहेर बसवून 15 वर्षांच्या मुलाला संधी देणे, हा एक मोठा जुगार मानला जात आहे. संजूच्या सध्याच्या फॉर्मचा दाखला देत त्याला वगळले असले, तरी चाहत्यांमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये या निर्णयावरून तीव्र नाराजी आहे. टीम इंडियाच्या प्रयोगशाळेत पुन्हा एकदा संजूचा बळी दिला गेला का? असा संतप्त सवाल संजूचे चाहते विचारत आहेत.

आयपीएलचा स्टार; आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करण्याची वेळ

वैभव सूर्यवंशीकडे गुणवत्ता ठासून भरली आहे, यात शंका नाही. नुकत्याच झालेल्या आयपीएल 2026 मध्ये त्याने राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना वादळी फलंदाजी केली होती आणि संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. इतकेच नव्हे तर, तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यातही त्याने 94 धावांची तुफानी खेळी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दडपण वेगळे असते. संजू सॅमसनसारख्या दिग्गज खेळाडूला बेंचवर बसवून जर वैभवला संधी मिळत असेल, तर आता त्याला आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडून स्वतःला सिद्ध करावेच लागेल. क्रिकेट चाहत्यांना आता तिसऱ्या सामन्यात वैभवच्या बॅटमधून एका धमाकेदार खेळीची अपेक्षा आहे, जेणेकरून त्याच्या निवडीवर होणारी टीका थांबेल.

पुढील सामना कधी?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पुढील सामना 9 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्याची सुवर्णसंधी असेल.

हे ही वाचा -

Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाचा विजय की रेफरीची कृपा? मेस्सीच्या विजयानंतर फुटबॉल जगतात खळबळबळ, इजिप्तचा संताप, फिफावर केले नको नको ते आरोप

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget